भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. जडेजा केवळ गोलंदाजीत नाही तर फलंदाजीतही उत्तम कामगिरी करत आहे. त्याने त्याच्या फलंदाजीत केलेल्या सुधरानंतर तो संघासाठी खालच्या मध्य क्रमातील (lower middle order) एक उत्तम खेळाडू बनला आहे आणि त्याच्या खेळातील सुधाराचे संपूर्ण श्रेय त्याने माजी भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनीला दिले आहे.
त्याने सांगितले आहे की, धोनीच्या एका सल्ल्याने त्याची संपूर्ण कारकीर्द बदलली. धोनीने त्याला 2015 मध्ये एक सल्ला दिला होता. त्यानंतरच त्याच्या फलंदाजीमध्ये मोठा बदल आला आहे.
याबद्दल रवींद्र जडेजाने एका मुलाखतीत सांगितले की, “2015 मध्ये विश्वचषक स्पर्धेदरम्यान धोनीने मला सांगितले होते की, मी तो चेंडूही मारण्याचा प्रयत्न करतोय; जो मारायला नको आहे. त्यानंतर मलाही वाटले की, माझी शॉट निवड चुकीची होत आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला माझा फलंदाजीतील अंदाज बरोबर असत नसे. फलंदाजी दरम्यान मी गोंधळलेला असायचो. मला या चेंडूवर शॉट खेळायचा आहे की नाही? हेच समजत नसे.”
परंतु आता त्याने आपल्या फलंदाजीत बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. रवींद्र जडेजा सध्या भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडमध्ये त्याला कसोटी मालिका खेळायची आहे. त्यानंतर आयपीएल 2021 मध्ये तो पुन्हा धोनीसोबत दिसणार आहे. रवींद्र जडेजा धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज या संघात खेळतो. जडेजाच्या फलंदाजीतील प्रगतीनंतर तो चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी फिनिशरच्या भूमिकेत दिसतो आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो भारतीय संघासाठी फिनिशरच्या भूमिकेत दिसू शकतो. 4 ऑगस्टपासून नॉटिंघम कसोटी सामन्याने या मालिकेची सुरुवात होणार आहे. 14 सप्टेंबर रोजी ही मालिका संपेल.
महत्त्वाच्या बातम्या-
जसप्रीत बुमराहचा अनोखा सराव, चक्क बॅटिंग पॅड घालून केली गोलंदाजी; प्रतिक्रियांचा आला पूर
उडानानंतर श्रीलंकेचे आणखी काही क्रिकेटर घेऊ शकतात निवृत्ती, एक तर देश सोडण्याच्या तयारीत!
अतिउत्तम! ‘या’ देशाचे क्रिकेटरही खेळणार आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात, भारतासोबतच धरणार युएईची वाट