भारतीय क्रिकेट पुरूष संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी याने रविवारी (25 सप्टेंबर) याने ओरिओ बिस्किट लाँच केले. त्याने ओरिओसोबत लाईव्ह येत याची घोषणा केली आहे. त्यापूर्वी बहुतेक जणांनी तो क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारामधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर करेल असे निष्कर्ष लावले जात होते, मात्र असे काही झाले नाही. यामुळे या दिग्गज क्रिकेटपटूच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. याचवेळी त्याने मोठी भविष्यवाणी केली आहे.
या थेट प्रक्षेपणामध्ये एमएस धोनी (MS Dhoni) याने 2022च्या टी20 विश्वचषक कोण जिंकणार याचे उत्तर कोड्यात दिले आहे. मात्र त्याने केलेल्या विधानाने क्रिकेटविश्वात एकच खळबळ माजली आहे.
लाँचिंगमध्ये धोनी म्हणाला, “भारत यावर्षी विश्वचषक जिंकणार.” त्याच्या या विधानावर उपस्थित असलेल्या अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. उपस्थितांपैकी एकाने धोनीला विचारले, “हे कसे काय शक्य आहे? तेव्हा धोनी उत्तरला “2011मध्ये ओरिओचे भारतात लाँच झाले होते, तेव्हा भारत जिंकला. आताही भारतात ओरिओचे पुन्हा एकदा लाँच झाले आहे आणि 2022चा टी20 विश्वचषक खेळला जाणार आहे. याचे कनेक्शन तुम्ही जोडू शकता.”
धोनीने शनिवारी (24 सप्टेंबर) सोशल मीडियावर पोस्ट करत तो लाईव्ह येणार हे सांगितले होते. यानंतर या 41 वर्षीय क्रिकेटपटूच्या या पोस्टचा अनेकांनी वेगवेगळा अंदाज लावला. धोनीने ऑगस्ट 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणे सुरू ठेवले आहे.
आता आयपीएलचा पुढील हंगाम जुन्या पद्धतीने खेळला जाणार आहे. याचा अर्थ संघ आता घरच्या आणि विरोधी संघांच्या मैदानावर खेळणार आहेत. यामुळे धोनी पुन्हा एकदा चेन्नईमध्ये खेळताना दिसणार आहेत. यासाठी कधी एकदाचा आयपीएल 2023 सुरू होतो याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आता तुम्हीच सांगा!’, शुबमन गिलने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांकडे मागितला न्याय
हैदराबादच मैदान मारताच कॅप्टन रोहित करणार ‘नऊ नंबरी’ पराक्रम
कुलदीपच्या जाळ्यात अडकला न्यूझीलंड संघ, फिरकी गोलंदाजासमोर फलंदाजांचे लोटांगण