---Advertisement---

एमएस धोनीने केली चाहत्याची इच्छा पूर्ण, सोशल मिडीयावर व्हायरल झाला व्हिडिओ

On: शनिवार, नोव्हेंबर 2, 2019 6:00 PM
---Advertisement---

भारतीय किक्रेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी मैदानापासून लांब असला तरी चाहत्यांमधील त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.

धोनीही बऱ्याचदा त्याच्या चाहत्यांना नाराज करत नाही. तो अनेकदा त्याच्या चाहत्यांशी बोलताना दिसतो. नुकताच सोशल मिडियावर धोनीचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे.  त्यामध्ये तो एका चाहत्याची इच्छा पूर्ण करताना दिसून येत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की एका चाहत्याने धोनीला त्याच्या मोटारसायकलवर स्वाक्षरी करायला सांगितले. धोनीनेही त्याला नाराज केले नाही. धोनीने मोटारसायकलच्या इंधन टाकीवर स्वाक्षरी केली.

https://twitter.com/msdfansofficial/status/1190591246894428160

धोनी स्वत: मोटारसायकल चालवण्याचा चाहता आहे. त्याच्याकडे अनेक मोटारसायकलचा संग्रह आहे. त्यामध्ये जुन्या मोटारसायकलींपासून जगातील सर्वात शानदार मोटारसायकलींचा समावेश आहे.

सध्या धोनी भारतीय संघातून बाहेर आहे. आयसीसी विश्वचषकातील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला. त्यानंतर धोनीने संघातून विश्रांती घेतली आहे.

अलीकडेच बीसीआयचे नवे अध्यक्ष सौरव गागुंलीने तो लवकरच धोनीबरोबर त्याच्या भविष्याबद्दल बोलणार असल्याचे म्हटले आहे.

https://twitter.com/msdfansofficial/status/1189919707408683008

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---