भारताचा कॅप्टन कुल एमएस धोनीने 14 वर्षांपूर्वी 23 डिसेंबर 2004 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने हे पदार्पण बांगलादेश विरुद्ध वनडे सामन्यातून केले होते. त्यानंतर त्याने त्याच्या कारकिर्दीत कधी मागे वळून पाहिलेच नाही. त्याने या 14 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक यशाची शिखरे गाठली.
याबरोबरच त्याने भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि यष्टीरक्षक ठरताना अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. भारताने 2 विश्वचषकही त्याच्या नेतृत्वाखाली जिंकले.
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची 14 वर्षे पूर्ण करणाऱ्या एमएस धोनीबद्दल या खास गोष्टी –
-क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात भारताचे नेतृत्व करणारा धोनी पहिला यष्टीरक्षक फलंदाज आहे.
-आयसीसीच्या मोठ्या तीनही स्पर्धा जिंकणारा धोनी पहिलाच कर्णधार आहे. त्याने 2007 मध्ये टी20 विश्वचषक, 2011 मध्ये वनडे विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन्ही स्पर्धांची विजेतेपद कर्णधार म्हणून मिळवली आहेत.
-धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यष्टीचीत करणारा यष्टीरक्षक आहे. त्याने आत्तापर्यंत 186 यष्टीचीत केले आहेत. तसेच तो यष्टीमागे सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 806 विकेट्स यष्टीरक्षण करताना घेतल्या आहेत. या यादीत धोनीच्या पुढे मार्क बाउचर(998) आणि अॅडम(905) गिलख्रिस्ट आहे.
-ट्वेंटी20मध्ये कर्णधार म्हणून 150 सामने जिंकणारा धोनी पहिला कर्णधार आहे.
-धोनीच्या नावावार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याचाही विक्रम आहे. त्याने 211 षटकार मारले आहेत.
-धोनीने 2005 मध्ये श्रीलंका विरुद्ध वनडे सामन्यात नाबाद 183 धावा केल्या होत्या. कोणत्याही यष्टीरक्षक फलंदाजाने वनडेमध्ये केलेल्या या सर्वोच्च वैयक्तिक धावा आहेत.
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 सामने खेळणारा धोनी पहिला आणि एकमेव यष्टीरक्षक फलंदाज आहे. तसेच 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडने हा पराक्रम केला आहे.
-वनडेमध्ये भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. त्याने 329 वनडे सामन्यात भारताकडून 9999 धावा केल्या आहेत.
-धोनीने वनडे आणि कसोटी क्रिकेटमधील त्याचे पहिले शतक पाकिस्तान विरुद्ध केले आहे.
-धोनी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. त्याने 93 टी20 सामने भारताकडून खेळले आहेत. यातील 72 सामन्यात त्याने नेतृत्व केले आहे.
-आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करण्याचा विक्रम एमएस धोनीच्या नावावर आहे.
-धोनी आयसीसीचा सर्वोत्तम वनडे खेळाडूचा पुरस्कार सलग दोन वर्षे मिळवणारा पहिला क्रिकेटपटू आहे. त्याने 2008 आणि 2009 असे दोन वर्षे हा पूरस्कार मिळवला आहे.
-कर्णधार असताना आणि 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक शतके करण्याचा विक्रमही संयुक्तरित्या धोनी आणि कपिल देव यांच्या नावावर आहे. त्यांनी कर्णधार असताना आणि 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना प्रत्येकी 3 शतके केली आहेत.
-धोनीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर विराजमान झाला.
-आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये एकही अर्धशतक न करता 1000 धावा पूर्ण करणारा धोनी पहिला क्रिकेटपटू आहे.
-2011 मध्ये धोनीला भारतीय आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल हे सन्माननीय पद मिळाले. हे पद मिळवणारा धोनी कपिल देव यांच्या नंतरचा दुसराच भारतीय क्रिकेटपटू आहे.
-धोनी हा भारताचे दिग्गज गायक किशोर कुमार यांचा चाहता आहे.
-धोनी फुटबॉल, बॅडमिंटन बरोबरच डब्ल्यूडब्ल्यूईचाही मोठा चाहता आहे. यातील हिटमॅन हार्ट आणि हल्क होगन हे त्याचे आवडते रेसलर्स आहेत.
-धोनीने त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत अभिनेता जॉन अॅब्रहमकडून प्रेरणा घेऊन लांब केस केले होते.
महत्त्वाच्या बातम्या:
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १९- मुंबईचा ९११
–विजय- राहुलला डच्चू, हे दोन खेळाडू करणार टीम इंडियाची ओपनिंग ?