---Advertisement---

एमएस धोनी करतोय पत्नी साक्षीबरोबर रोमांटिक डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल

On: बुधवार, जानेवारी 1, 2020 7:38 PM
---Advertisement---

आजपासून 2020 हे वर्ष सुरु झाले आहे. या नववर्षाचे भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि त्याची पत्नी साक्षीने पुण्यात जंगी स्वागत केले आहे. यादरम्यानचे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत.

नुकतेच साक्षीने धोनीबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे की ‘2020 या व्यक्तीबरोबर.’ या मिस्टर आणि मिसेस धोनीच्या फोटोला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली असून सध्या हा फोटो व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/B6vogFwnNBx/

त्याचबरोबर या जोडीने एकत्र डान्सही केल्याचा व्हिडिओही सध्या व्हायरल झाला आहे. धोनीच्या फॅन क्लब्सच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरुन हे व्हिडिओ शेअर होत आहेत. या व्हिडिओमध्ये धोनी आणि साक्षी एकत्र रोमांटिक डान्स करताना दिसून येत आहे.

धोनी भारताकडून त्याचा शेवटचा सामना 2019 विश्वचषकातील उपांत्यफेरीत न्यूझीलंड विरुद्ध खेळला आहे. त्यानंतर त्याने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे सध्या त्याच्या भविष्याबद्दल क्रिकेटवर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा होत असतात.

पण काही दिवसांपूर्वी त्यानेच एका कार्यक्रमादरम्यान जानेवारी 2020 पर्यंत याबद्दल काहीही विचारु नका असे सांगितले होते.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---