भारतीय क्रिकेटमधील 40 वर्षांचा सर्वात तरुण खेळाडू म्हणून महेंद्रसिंग धोनी ओळखला जातो. धोनी फक्त एका खेळाडूचे नाव नसून ते एका पर्वाचे नाव आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. भारतीय संघाला 2 विश्वचषक जिंकून देणारा हा माजी कर्णधार भलेही सगळ्यात वयस्कर खेळाडू असला तरीही तो संघातील सगळ्यात फिट खेळाडूंपैकी एक होता.
त्याच्या दृष्टीने वय हा फक्त एक आकडा असल्याप्रमाणे होता. या गोष्टीचा पुरावा सगळ्यांना बघायला मिळाला, जेव्हा धोनीने युवा खेळाडू हार्दिक पांड्याला शर्यतीत पछाडले होते. हे दृश्य आपल्याला 4 वर्षांपूर्वी मोहलीच्या मैदानावर सामन्यांपूर्वीच्या सरावादारम्यान बघायला मिळाले होते.
2017 साली भारत आणि श्रीलंका संघादरम्यान एकदिवसीय सामना मोहलीच्या मैदानावर होणार होता. या सामन्याआधी कर्णधार धोनी आपल्या सहकाऱ्यांसोबत सराव करत होता. त्यादरम्यानच धोनी आणि पांड्यादरम्यान 100 मीटर धावण्याची शर्यत लागली. दोघांनी सोबतच धावायला सुरवात केली आणि सुरवातीला पांड्या धोनीच्या पुढे होता. परंतु शेवटी धोनीने त्याला पछाडलेच. वास्तविक पांड्याचे वय पाहता अनेक लोकांनी त्याच्याकडून या वरिष्ठ खेळाडूला हरवण्याची अपेक्षा ठेवली होती. परंतु तसे न होता धोनीनेच शर्यतीत पांड्याला हरवले. या शर्यतीने एक गोष्ट समजून चुकली की, वयस्कर असला तरी वेगाच्या बाबतीत धोनी युवकांनाही पछाडू शकतो.
A quick 100 metre dash between @msdhoni and @hardikpandya7. Any guesses on who won it in the end? #TeamIndia #INDvSL pic.twitter.com/HpboL6VFa6
— BCCI (@BCCI) December 13, 2017
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) ने राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंना योयो चाचणी पास होणे बंधनकारक केले आहे. 2018 साली, योयो चाचणीत नापास झाल्यामुळे अंबाती रायडु आणि मोहम्मद शमीला राष्ट्रीय संघाबाहेर करण्यात आले होते. नंतर फिटनेस चाचणीत यशस्वी झाल्यावर त्यांना पुन्हा संघात घेण्यात आले.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार असून तो पुन्हा आयपीएल २०२१मध्ये पिवळ्या सैन्याचे नेतृत्व करतांना दिसून येईल. कोरोना महामारीमुळे स्थगित झालेली आयपीएल स्पर्धा सप्टेंबर महिन्यात पुन्हा सुरू होणार असून धोनीच्या चाहत्यांना त्याच्याकडून धमाकेदार कामगिरीची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अनुष्काच्या कॉफीवरुन टीका, पण ऑस्ट्रेलियामध्ये जिंकल्यावर कौतुक नाही- माजी निवडकर्ता
आयपीएलचा नादच खुळा! खेळाडू तर खेळाडू, प्रशिक्षकसुद्धा करोडपती; पाहा त्यांचा पगार
द्रविडने मॅचविनर खेळाडूंची रांग लावली, भारतीय संघाचं चित्र पालटलं; परदेशी खेळाडूकडून स्तुती