भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. धोनीचे गाड्यांविषयीचे प्रेम कधीच लपून राहिले नाहीये. धोनीने आपल्या राहत्या घरी रांचीमध्ये एखाद्या शोरूमपेक्षा अधिक गाड्या जमा करून त्याचे कलेक्शन केले आहे. रांचीतील रस्त्यांवर अनेकदा आपल्या आवडत्या गाडीत किंवा बाईकवर दिसणाऱ्या धोनीचा नवा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.
भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार अशी एमएस धोनी (MS Dhoni) याची ओळख आहे. धोनीने भारताला कर्णधाराच्या रुपात आयसीसी वनडे विश्वचषक, आयसीसी टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या तिन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय कर्णधार आहे. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी आयपीएलमध्ये अजूनही खेळत आहेत. अशात त्याला स्वतःची आवड जोपासण्यासाठी पुरेसा वेळ त्याला सध्या मिळत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत धोनी 1973 सालची पॉन्टिआक ट्रॅन्स एएम एसडी 755 (1973 Pontiac Trans Am SD-455) ही गाडी चावताना दिसत आहे. ही ताकदीची गाडी धोनी आगदी निवांतपणे चावताना दिसत आहे. चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया हा व्हिडिओ पाहिल्यानंतर येत आहेत.
MS Dhoni driving 1973 Pontiac Trans Am SD-455 in Ranchi. pic.twitter.com/LQANMJXWwg
— Johns. (@CricCrazyJohns) July 31, 2023
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच धोनीच्या रांचीतील घरी माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद आणि सुनील जोशी यांनी भेट दिली होती. त्यावेळी प्रसादने धोनीच्या कार आणि बाईक कलेक्शनचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला होता. हा व्हिडिओ देखील तुफान व्हायरल झाला होता.
https://www.instagram.com/reel/CuzxphiAmcS/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
एमएस धोनी इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगाम संपल्यानंतर आयपीएलमधून निवृत्ती घेईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आगामी आयपीएल हंगामात देखील तो खेळण्याची शक्यता आहे. धोनीच्या नेतृत्वात मागच्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपद पटकावले. पण धोनीने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली नाही. आयपीएल 2022 मध्ये धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडले होते. मात्र रविंद्र जडेजा कर्णधारपदाचा भार सांभाळू शकला नाही आणि धोनीला हा जबाबदारी पुन्हा स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागली. सध्या चाहत्यांमध्ये याबाबत प्रचंड संभ्रम आहे की, धोनी आगामी आयपीएल हंगाम खेळणार की नाही. त्याच्या नेतृत्वात सीएसके यावर्षी आपली पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकली आणि मुंबई इंडियन्स संघाची बरोबरी देखील केली. (MS Dhoni driving 1973 Pontiac Trans Am SD-455 in Ranchi.)
महत्वाच्या बातम्या –
ASHES 2023 । ब्रॉडबाबत बोलताना अँडरसनला भावना अनावर, डोळ्यातून पाणी आल्याचा VIDEO व्हायरल
नाबाद 137 धावा करून एमआयला जिंकवणाऱ्या पूरनची रिएक्शन व्हायरल, पाहा एमएलसी 2023ची विनिंग मुव्हमेंट