आयपीएल 2023 मध्ये रविवारी (23 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात यजमान संघावर चेन्नईने एकतर्फी वर्चस्व गाजवले. फलंदाजांनी उभारलेल्या विक्रमी धावसंख्येचा गोलंदाजांनी बचाव करत 49 धावांनी मोठा विजय मिळवून दिला. यासह चेन्नईने पाच विजयांसह गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले. त्याचवेळी या सामन्यानंतर बोलताना चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी हा भावूक झालेला पाहायला मिळाला.
केकेआरच्या घरच्याच मैदानावर चेन्नईने हा विजय मिळवल्यानंतर चेन्नई गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचली. संघाच्या विजयानंतर ध्वनी खुश दिसला. त्याने सामनानंतर झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना म्हटले,
“तुम्ही सर्वांनी दिलेल्या पाठिंबासाठी मी धन्यवाद म्हणू इच्छितो. तुम्ही लोक मला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने आलेला. पुढच्या सामन्यावेळी तुम्ही केकेआरची जर्सी घालून याल. तुम्ही मला निरोप देण्याचा प्रयत्न करत आहात, मी नेहमीच तुमचा ऋणी राहील.”
या सामन्यात केकेआरपेक्षा अधिक पाठिंबा लोक सीएसके व धोनीला देत होते. ईडन गार्डन स्वर मोठ्या प्रमाणात पिवळ्या रंगाची जर्सी घातलेले चाहते दिसून आले. नाणेफेकीवेळी धोनीने आपण कोलकातापासून जवळ असलेल्या खरगपूर येथे रेल्वेत नोकरी केली असल्याची आठवण देखील करून दिली होती.
या सामन्याचा विचार केल्यास चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे,अजिंक्य रहाणे व शिवम दुबे यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे 235 ही हंगामातील सर्वात मोठी धावसंख्या उभी केली. या धावांचा पाठलाग करताना केकेआरचा संघ अपयशी ठरला. जेसन रॉय व रिंकू सिंग यांनी अर्धशतके करत संघर्ष केला. मात्र, ते 186 पर्यंतच पोहोचू शकले.
(MS Dhoni Emotional After Receive Huge Support At Eden Gardens)