भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता धोनी आपल्याला फक्त आयपीएल सामने खेळताना मैदानावर दिसतो. याशिवाय धोनी वेगवेगळ्या कारणाने नेहमी चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच धोनीनी एक घोडा खरेदी केला आहे. त्या घोड्यासोबत शर्यत लावलेला धोनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये धोनी डोंगराच्या शिखरावर व्यायाम करताना दिसून येत आहे.
धोनी आपल्या परिवारासोबत आणि मित्रांसोबत सुट्टीसाठी हिमाचल प्रदेशमधील शिमलामध्ये गेला आहे. धोनीची पत्नी साक्षीने व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये एका सुंदर कॉटेजचे व्हिडीओ शेअर केले आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये धोनी सायकलिंग करताना दिसून येत आहे. तर त्याची मुलगी झिवा ही शेजारी उभा राहून डोंगर बघत आहे.
https://www.instagram.com/p/CQYX-UJnt_2/
धोनी हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलाच्या जवळील रतनारी गावात आहे. रतनारी हे गाव सफरचंदच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. रतनारी शिमला पासून 43 किमी दूर आहे. धोनीनी सुट्टीसाठी पूर्ण कॉटेज भाड्यावर घेतले आहे.
https://www.instagram.com/p/CQYOK2pnw4w/
धोनी आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांमध्ये दिसणार
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल 2021 ला 29 सामन्यांनंतर स्थगिती दिली होती. या स्पर्धेदरम्यान धोनीच्या आई-वडिलांनाही कोरोनाची लागण झाली होती. परंतु त्यावेळी धोनी चेन्नई सुपर किंग्स संघासोबत होता. जेव्हा आयपीएलला स्थगिती मिळाली होती, तेव्हा धोनी सर्व खेळाडूंना घरी पोहोचवल्यानंतर ते आपल्या घरी गेला होता.
आता धोनी सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या उर्वरित आयपीएल 2021 सामन्यांमध्ये मैदानावर दिसून येणार आहेत. आयपीएल 2021 चे उर्वरित सामने 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. धोनी यांच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2021 मध्ये 7 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून गुणतालिकेत चेन्नई संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अजबच! फलंदाजाने इतका जोरात षटकार खेचला की स्वत:च्याच कारची फोडली काच, व्हिडिओ होतोय व्हायरल