भारतात महेंद्रसिंह धोनीची फॅन फॉलोइंग किती आहे, हे सर्वांनाच माहित आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलं तर तेथे धोनीसाठी चाहत्यांमध्ये पागलपण दिसून येतं. शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर देखील असंच दृष्य पाहायला मिळालं.
शुक्रवारी (10 मे) अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल 2024 चा 59वा सामना खेळला गेला. या सामन्यात ‘माही’चा एक चाहता सुरक्षा रक्षकाला चकमा देऊन चक्क मैदानातच घुसला. हा चाहता धोनीजवळ आला आणि त्यानं धोनीचे पाय पकडले. धोनीनं त्या चाहत्याला उचललं आणि गळ्याशी लावलं. यानंतर धोनी त्याच्या गळ्यात हात घालून काहीतरी बोलायला लागला. तेवढ्या वेळात सुरक्षा रक्षक मैदानात आले आणि त्या चाहत्याला ओढून घेऊन जाऊ लागले. तेव्हा एमएस धोनीनं सुरक्षा रक्षकाला हातानं रोखलं आणि चाहत्याला सुरक्षित बाहेर जाऊ दिलं. धोनीच्या या वागण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहते यासाठी त्याची खूप प्रशंसा करत आहेत.
MS Dhoni had a word with the pitch invader after he hugged and touched MS’ feet.
– MS told security to go easy on the fan. ❤️pic.twitter.com/nuxgL1msOe
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 11, 2024
एमएस धोनीनं गुजरातविरुद्ध आपल्या फलंदाजीनं चाहत्याचंं खूप मनोरंजन केलं. 42 वर्षीय ‘माही’नं केवळ 11 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं नाबाद 26 धावा केल्या. मात्र तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
या सामन्यात गुजरात टायटन्सनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 3 गडी गमावून 231 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईची टीम 20 षटकांत 8 गडी गमावून 196 धावाच करू शकली. अशाप्रकारे गुजराजनं हा सामना 35 धावांनी जिंकला. या विजयासह शुबमन गिलच्या संघानं प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत.
गुजरात टायटन्सचा हा 12 सामन्यांमध्ये 5वा विजय होता. संघ गुणतालिकेत 10 अंकांसह आठव्या स्थानी आहे. तर चेन्नई सुपर किंग्जची टीम 12 सामन्यांत 6 विजय आणि 6 पराभवासह चौथ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईला पराभवाचे पाणी पाजत गुजरात टायटन्स संघाने प्लेऑफच्या आशा ठेवल्या जिवंत ! IPL 2024
अखेर ऋतुराज गायकवाडनं जिंकला टॉस, गुजरातला फलंदाजीचं आमंत्रण; जाणून घ्या प्लेइंग 11