दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचे विजेतेपद एमएस धोनीच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्सने पटकावले. चेन्नई सुपर किंग्सने अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव केला आणि चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावलं. दरम्यान, दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेला हा अंतिम सामना पाहाण्यासाठी स्टेडियममध्ये आलेल्या एका धोनीच्या चाहतीने एक खास पोस्टर झळकावले. तिच्या पोस्टरचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
धोनीची लोकप्रियता जगभरात आहे. याचाच प्रत्येय अंतिम सामन्यादरम्यानही आला. अंतिम सामना सुरु असताना एका मुलीवर कॅमेरा गेला. त्यामुळे तिने झळकावलेल्या पोस्टरची छबी सर्वांना पाहायला मिळाली.
तिने जे पोस्टर झळकावले, त्यावर लिहिले होते की ‘माही तू जिथे, आम्ही तिथे! चेन्नईवरुन थेट दुबई, केवळ तुला खेळताना पाहाण्यासाठी. सीएसके प्लीज चषक घरी परत आणा.’ तिच्या या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यामुळे तिच्या पोस्टरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Mahi tum jaha hum wahan ???? pic.twitter.com/EXlM2SmEyD
— Sumit ???????? (@innocent2904) October 15, 2021
सीएसकेनेही या चाहतीला नाराज न करता चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले. यापू्र्वी सीएसकेने २०१०,२०११ आणि २०१९ साली आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. सध्या सर्वाधिकवेळा आयपीएल विजेतेपद जिंकण्याचा मान रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सकडे आहे. त्यांनी तब्बल ५ वेळा आयपीएल चषक उंचावला आहे.
A fan travelled to Dubai from Chennai for MS Dhoni. pic.twitter.com/kw5Ofc2VpZ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 15, 2021
अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, नाणेफेक जिंकून कोलकाताने सीएसकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद १९२ धावांचा डोंगर उभा केला. सीएसकेकडून फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक ८६ धावांची खेळी केली. त्याने ५९ चेंडूत केलेल्या या खेळीत ७ चौकार आणि ३ षटकार मारले.
त्याला या खेळी दरम्यान ऋतुराज गायकवाड(३२), रॉबिन उथप्पा(३१) आणि मोईन अली (३७*) यांनी चांगली साथ दिली. कोलकाताकडून सुनील नारायणने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच शिवम मावीने १ विकेट घेतली.
त्यानंतर, १९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताकडून शुबमन गिल(५१) आणि व्यंकटेश अय्यरने(५०) अर्धशतकं झळकावली. पण, अन्य फलंदाज मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे कोलकाताला २० षटकात ९ बाद १६५ धावाच करता आल्या. त्यामुळे चेन्नईने हा सामना २७ धावांनी जिंकत आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावावर केले,
चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर, रविंद्र जडेजा आणि जोश हेजलवूडने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच, दीपक चाहर आणि ड्वेन ब्रावोने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
“मी तितका भाग्यशाली नाही की, मी धोनी असलेला ड्रेसिंग रूमचा भाग होईल”, गावसकरांनी गायले गुणगान
लहान मुलाचा डान्स पाहून विराट कोहली थक्क, व्हिडिओ लिंक शेअर करत लिहिला भावुक संदेश
Video: आयपीएल ट्रॉफी घेऊन ऋतुराजची हॉटेलमध्ये दिमाखात एन्ट्री, सीएसकेने केला विजयी जल्लोष






