कोरोना व्हायरसमुळे पूर्ण जगभरासह आपल्या देशातही मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासन आणि प्रशासन युध्द पातळीवर प्रयत्न करीत असून कोरोनाला हरवण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातुन सहकार्य होत आहे. अशातच महाराष्ट्रातील धोनी प्रेमीही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.
देशाबद्दल असलेली आपली सामाजिक बांधलकी जपत भारताता माजी कर्णधार धोनीच्या महाराष्ट्रातील या फॅन क्लबने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये १३ हजार ७७ रुपये जमा करत आपले योगदान दिले आहे. या फॅन क्लबचे नाव ‘MHMsdianClub’ असून हा क्लब नेहमी समाजउपयोगी उपक्रमांसाठी ओळखला जातो. MS Dhoni fans donates to Maharashtra CM relief Funds to fight against Covid-19.
MS Dhoni Fans club Maharashtra हा नेहमीच सामाजिक भान राखून आपले कर्तव्य पार पाडत आला आहे. धोनीप्रेमींचे प्रत्येक राज्यात असे क्लब असून तेही कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मदत जमा करत आहेत. यापूर्वी बंगालच्या धोनीप्रेमींनीही अशीच काहीशी मदत केली होती.
We The (MS Dhoni Fans Club: Maharashtra) @MHMsdianClub
just donated 13,077 Rs for #FightAgainstCoronavirus #CMReliefFund in order to provide support towards State Of #Maharashtra @CMOMaharashtra@msdhoni @ChennaiIPL @CSKFansOfficial
Let's fight together, we will surely defeat pic.twitter.com/yaG5Nnj7Se— Sanjay Msd (@SanjayMsd07) April 7, 2020
We The (MS Dhoni Fans Club: Maharashtra) just donated 13,077 Rs for #FightAgainstCoronavirus #CMReliefFund in order to provide support towards State Of #Maharashtra @CMOMaharashtra@msdhoni @ChennaiIPL @CSKFansOfficial
Let's fight together, we will surely defeat #CoronaPandemic pic.twitter.com/REjifiLcp7— MAHARASHTRA MSDIAN CLUB™ (@MHMsdianClub) April 7, 2020
धोनी विश्वचषक २०१९पासून क्रिकेटपासून दुर आहे. तसेच तो आयपीएलमध्ये खेळून भारतीय संघात परतण्यासाठी उत्सुक होता परंतु कोरोनामुळे आयपीएल रद्द झाली असल्यामुळे सध्यातरी धोनीचे क्रिकेटमधील भविष्य अधांतरी आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
–जी गोष्ट धोनीने गेल्या १० वर्षात नाही केली ती या वर्षी करत होता
-रोहित जेव्हाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतो तेव्हा त्यांना नडतोच
-३ अशा चुका, ज्यामुळे विश्वचषकात भारताला झालेत मोठे तोटे
-वादामुळे क्रिकेट करियर संपलेले ५ क्रिकेटपटू