शुक्रवारी (19 एप्रिल) लखनऊच्या एकना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल 2024 चा 34वा सामना खेळला गेला. या सामन्यापूर्वी चेन्नईचा गोलंदाज दीपक चहरनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये लखनऊमध्ये आलेला पिवळ्या रंगाचा पूर दिसतोय. हा महापूर ‘थाला’ अर्थातच महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांचा आहे!
दीपक चहरनं हा व्हिडिओ चेन्नईच्या बसच्या आतून शूट केला आहे. व्हिडिओमध्ये माहीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. व्हिडिओमध्ये चाहते हातात मोबाईल घेऊन बसच्या मागे धावताना दिसतायेत.
Instagram story of Deepak Chahar from Lucknow stadium.
– The Craze for CSK & Dhoni. 🥶 pic.twitter.com/VzGaaYCsnB
— Johns. (@CricCrazyJohns) April 19, 2024
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात लखनऊनं नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावा केल्या. चेन्नईकडून रवींद्र जडेजानं शानदार फलंदाजी केली. तो 40 चेंडूत 57 धावा करून नाबाद राहिला. आपल्या या खेळीत त्यानं 5 चौकार आणि 1 षटकार ठोकला. सलामीवीर अजिंक्य रहाणेनं 24 चेंडूत 36 आणि मोईन अलीनं 20 चेंडूत 30 धावांचं योगदान दिलं.
चेन्नईसाठी महेंद्रसिंह धोनीनं अखेरच्या षटकांमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली. धोनीनं अवघ्या 9 चेंडूत 28 धावा ठोकल्या. आपल्या या खेळीत त्यानं 3 चौकार आणि 2 षटकार लगावले. लखनऊकडून क्रुणाल पांड्यानं शानदार गोलंदांजी केली. क्रुणालनं 3 षटकांमध्ये 16 धावा देत 2 बळी घेतले.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर
इम्पॅक्ट प्लेअर्स – अर्शीन कुलकर्णी, कृष्णप्पा गौथम, युधवीर सिंग, मणिमरण सिद्धार्थ, अर्शद खान
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना
इम्पॅक्ट प्लेअर्स – समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, निशांत सिंधू, मिचेल सँटनर
महत्त्वाच्या बातम्या –
मोहिसनचा ऑर्कर अन् रवींद्र चारी मुंड्या चित! पहिल्याच चेंडूवर पकडला पॅव्हेलियनचा रस्ता; पाहा VIDEO
पंजाब किंग्जचं नशीबच फुटकं! शेवटच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत गमावले 4 सामने
पाच संघांवर भारी एकटा ‘हिटमॅन’! पॉवर प्ले मध्ये पाडतोय षटकारांचा पाऊस