IPLक्रिकेटटॉप बातम्या

झालं गेलं गंगेला मिळालं! धोनी-गंभीरनं एकमेकांना मारली मिठी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

आयपीएल 2024 च्या 22 व्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी आणि गौतम गंभीर आमनेसामने होते. या सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जनं शानदार विजय मिळवला, तर गंभीर मेंटॉर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला या हंगामातील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सीएसकेनं केकेआरचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यानंतर धोनी आणि गंभीर यांचा एक सुंदर क्षण सध्या खूप व्हायरल होतो आहे.

वास्तविक, सामना संपल्यानंतर धोनी आणि गंभीर यांनी एकमेकांना मिठी मारली. दोघांचा मिठी मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओत आपण पाहू शकता की, सामन्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ एकमेकांची भेट घेत होते. याच दरम्यान गंभीर आणि धोनी एकमेकांसमोर येतात. यानंतर हे दोघं एकमेकांना मिठी मारतात आणि हसून काहीतरी बोलतात.

 

येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, गौतम गंभीरनं आरसीबीविरुद्धच्या सामन्यानंतर विराट कोहलीलाही मिठी मारली होती. सामन्यात टाईम आऊट दरम्यान गंभीर केकेआरच्या खेळाडूंशी संवाद साधण्यासाठी आला, तेव्हा त्यानं कोहलीला मिठी मारली होती. ही भेट महत्त्वाची ठरते कारण, आयपीएलच्या मागील हंगामात गंभीर आणि कोहलीमध्ये बाचाबाची झाली होती. तेव्हा गंभीर लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर होता. मात्र या हंगामात मागील सर्व वाद विसरून हे दोन दिग्गज खेळाडू पुन्हा एकत्र दिसले.

तसं पाहिलं तर गंभीर आणि धोनीमध्ये देखील वाद असल्याचा बातम्या माध्यमांमध्ये फिरत असतात. काही विश्लेषकांच्या मते, धोनीनं तो भारतीय संघाचा कर्णधार असताना गंभीर ऐवजी विराट कोहलीला उपकर्णधार बनवलं, ज्यामुळे गंभीर नाराज होता.

सीएसके विरुद्ध केकेआर सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 137 धावाच करू शकली. चेन्नईनं हे लक्ष्य 17.4 षटकांत 3 गडी गमावून सहज गाठलं.

महत्त्वाच्या बातम्या-

चेन्नई सुपर किंग्ज विजयी ट्रॅकवर परतली, कोलकाताचा हंगामातील पहिला पराभव

रवींद्र जडेजाचा आयपीएलमध्ये अनोखा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

आयपीएलमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे गोलंदाज, तुषार देशपांडेच्या आधी ‘या’ गोलंदाजांनी केला आहे हा कारनामा

Related Articles