---Advertisement---

आयपीएलमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे गोलंदाज, तुषार देशपांडेच्या आधी ‘या’ गोलंदाजांनी केला आहे हा कारनामा

---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाऊट रायडर्स यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. आयपीएलच्या या दोन मोठ्या संघांमधील सामन्याची सुरुवात धमाकेदार झाली.

चेन्नईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेनं कोलकाताचा तुफानी फलंदाज फिलिप सॉल्टला पहिल्याच चेंडूवर बाद केलं. सॉल्टनं पहिला चेंडू गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तो रविंद्र जडेजाच्या हाती झेल देऊन बाद झाला. यासह तुषार देशपांडे गोलंदाजांच्या त्या स्पेशल लिस्ट मध्ये शामील झाला, ज्यांनी आयपीएलमध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, तुषार देशपांडे हा पहिला गोलंदाज नाही, ज्यानं अशी अनोखी कामगिरी केली आहे.

तुषार देशपांडेच्या या कामगिरीपूर्वी आयपीएलच्या इतिहासात असं 30 वेळा घडलं आहे, जेव्हा पहिल्याच चेंडूवर विकेट पडली. आतापर्यंत लसिथ मलिंगा, उमेश यादव, डर्क नॅन्स, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनी आयपीएलमध्ये दोन वेळा पहिल्या चेंडूवर विकेट घेतली आहे. आयपीएल 2023 बाबत बोलायचं झालं तर, मागील हंगामात 3 गोलंदाजांनी अशी कामगिरी केली होती. आयपीएलच्या मागील हंगामात मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि ट्रेंट बोल्ट यांनी डावाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती.

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वात प्रथम अशी कामगिरी करणारा गोलंदाज आहे सोहेल तन्वीर. त्यानं 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती. त्या सामन्यात पार्थिव पटेल सोहेलच्या स्विंग होणाऱ्या चेंडूवर बाद झाला होता.

आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात लसिथ मलिंगा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, डर्क नॅन्स आणि मोहम्मद शमी यांनी दोन वेळा पहिल्या चेंडूवर विकेट घेतली आहे. याशिवाय प्रवीण कुमार, इरफान पठान, ब्रेट ली, इशांत शर्मा, दीपक चहर, लक्ष्मीपती बालाजी, जयदेव उनाडकट, जगदीश सुचित, अशोक डिंडा केविन पीटरसन, अल्फान्सो थॉमस, मार्लन सॅमुअल्स, सोहेल तन्वीरस जोफ्रा आर्चर, पॅट कमिन्स, चामिंडा वास आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी ही कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सततच्या पराभवानंतर आरसीबीचे खेळाडू देवाच्या शरणी, मुंबईच्या सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन

IPL 2024 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या मयंक यादवची दुखापत किती गंभीर? पुढचे सामने खेळणार की नाही? जाणून घ्या अपडेट

एका षटकात 10 धावा वाचवायच्या असतील तर नसीम शाह आणि बुमराहपैकी कोणाची निवड करणार? बाबर आझमच्या उत्तरानं खळबळ!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---