तामिळनाडूमधील एका कुटुंबाने स्वत: चे घर एमएस धोनीच्या नेतृत्वखालील चेन्नई सुपर किंग्सच्या रंगात रंगवले होते. आता धोनीने या सुपर फॅनबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. तो केवळ माझाच नाही तर संपूर्ण सीएसके संघाचा सर्वात मोठा चाहता आहे असे धोनीने सांगितले. त्याने केलेलं काम सहजपणे करता येत नाही, ही गोष्ट नेहमी मनात राहील असेही धोनी म्हणाला.
चाहत्याबद्दल बोलताना धोनी म्हणाला की, “त्याने ज्या प्रकारे हे सर्व केले त्यावरून सिद्ध झाले आहे की तो सीएसकेचा मोठा चाहता आहे. त्याने आमच्या संघाबद्दल आणि माझ्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना पूर्णपणे भिन्न आहेत. हे काम सहजपणे करता येत नाही. आपण आधी कुटुंबासमवेत बसून विचार करतो, चर्चा करतो आणि मग आपण या प्रकारचा मोठा निर्णय घेतो.”
पुढे बोलताना धोनी म्हणाला की, “ही सोशल मीडियावरील पोस्ट नाही जी तुम्ही नंतर बदलवून टाकाल. ही गोष्ट नेहमीच माझ्या मनात राहील. त्यासाठी मी त्यांचे आणि त्यांच्या परिवाराचे आभार मानतो.”
धोनीच्या या प्रतिक्रियेचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Thala Dhoni's sweet reaction to the sweetest tribute! 🦁💛
A big #WhistlePodu for Super Fan Gobikrishnan and his family for all the #yellove, literally. #HomeOfDhoniFan @GulfOilIndia @thenewsminute pic.twitter.com/1wxWVnP00l
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 26, 2020
तामिळनाडूमधील अरंगूर येथील एका कुटुंबाने धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके संघाच्या जर्सीच्या रंगाने त्यांचे संपूर्ण घर रंगविले आहे. त्याने घराचे नाव धोनी फॅन असे ठेवले आहे. धोनी आणि सीएसकेचा सर्वात मोठा चाहता गोपी कृष्णन आपल्या कुटुंबासमवेत राहतो. तो त्या घराचा मालक आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-फॅन हूँ मैं! चाहत्याने चक्क सगळं घरच केलंय ‘धोनीमय’
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! भारत-ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ सामन्याचा घेऊ शकतात प्रत्यक्ष आनंद
व्हिडीओ: मॅक्सवेलच्या फिरकीत अडकला नितीश राणा, पहिल्याच षटकात दाखवला तंबूचा रस्ता
ट्रेंडिंग लेख –
कुमार संगकारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बावनकशी सोनं
गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
आयपीएलमध्ये डंका वाजलाच, आता ‘मिशन ऑस्ट्रेलिया’; ‘हा’ आर्किटेक्ट बांधणार संघाच्या विजयाचा पूल