---Advertisement---

धोनीकडून पाकिस्तानी गोलंदाजाला ‘स्पेशल गिफ्ट’! खेळाडूने ‘या’ शब्दात व्यक्त केली कृतज्ञता

On: शनिवार, जानेवारी 8, 2022 7:40 AM
MS-Dhoni
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला जागतिक क्रिकेटमध्ये मानाचे स्थान आहे. त्याचे चाहते भारतातच नाही, तर जगभरात पसरलेले आहेत. भारतीय संघासोबत विराधी संघातील खेळाडू देखील धोनीचा सन्मान करतात. अनेक युवा खेळाडूंची इच्छा असते की, एमएस धोनीशी त्यांची एकदा तरी भेट व्हावी. अशात जर एखाद्या खेळाडूने धोनीकडून भेट मिळाली, तर त्याच्या आनंदाला मर्यादाच राहत नाही. पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज हॅरिस राउफ (Haris Rauf) याच्यासोबत देखील असेच काहीसे झाले. धोनीने त्याला चेन्नई सुपर किंग्जची स्वतःची एक जर्सी भेट दिली आहे.

राउफ धोनीकडून त्याला मिळालेल्या या भेटीमुळे खूपच आनंदात आहे. त्याने स्वतःचा आनंद ट्वीटरवरून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याने या पोस्टमध्ये धोनीकडून मिळालेल्या जर्सीचा फोटो देखील टाकला आहे. धोनी मैदानावर खेळताना नेहमी सात क्रमांकाची जर्सी घालायचा आणि हीच जर्सी त्याने राउफला भेट दिली आहे.

पोस्टमध्ये राउफने लिहिले की, “दिग्गज आणि कॅप्टन कूल धोनीने सुंदर भेट देऊन मला सन्मानित केले आहे. सात नंबर अजूनही चांगल्या वागणूकीने लोकांची मने जिंकत आहे. रसेलला (रसेल राधाकृष्णन) समर्थनासाठी विशेष आभार.”

https://twitter.com/HarisRauf14/status/1479439584769441794

दरम्यान, राउफ सध्या ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्ससाठी खेळत आहे. या संघासाठी त्याने आतापर्यंत चालू हंगामात दोन सामने खेळले आहेत आणि तीन विकेट्स घेतल्या आहेत. २ जानेवारीला पर्थ स्क्रोचर्ससाठी खेळताना राउफने ४० धावा खर्च करून दोन विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर ३ जानेवारीला खेळल्या गेलेल्या मेलबर्न रेनेगेड्सविरुद्धच्या सामन्यात त्याने २६ धावा देऊन एक विकेट घेतली होती.

पाकिस्तान संघासाठी राउफने आतापर्यंत टी-२० आणि एकदिवसीय पदार्पण केले आहे, परंतु कसोटीमध्ये अद्याप त्याला संधी मिळालेली नाही. आतापर्यंत त्याने पाकिस्तान संघासाठी ३४ टी२० सामने खेळले आणि त्यामध्ये ४१ विकेट्स घेतल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत ८ सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आणि यामध्ये १४ विकेट्स घेतल्या.

महत्वाच्या बातम्या –

ईस्ट बंगालने केली आश्चर्यकारक निकालाची नोंद; मुंबईला गोलशून्य बरोबरीत रोखले

निवृत्तीची घोषणा केलेला टेलर पडलाय पेचात; म्हणाला, “मला वाटते…”

बंगालच्या आक्रमणावर हरियाणाचा संयम भारी! गतविजेत्यांना दिला पराभवाचा धक्का

व्हिडिओ पाहा –

टोकियो ऑलिम्पिक... भारतीय क्रीडाक्षेत्रात इतिहास घडवणारी स्पर्धा | India at Tokyo Olympics 2020

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---