भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या आपल्या कुटुंबासह रांची येथे वेळ घालवत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर दोन्ही केवळ आयपीएल खेळतो. त्यामुळे तो जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबाला देतोय. रविवारी (४ जुलै) धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांच्या लग्नाचा ११ वा वाढदिवस साजरा होत आहे. या लग्नाच्या वाढदिवशी धोनीने साक्षीला एक खास भेट दिली. साक्षीने ते छायाचित्र आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवरून सर्वांशी शेअर केले.
धोनीने दिली खास भेट
क्रिकेट जगतातील सर्वात प्रसिद्ध दांपत्य असलेले धोनी व साक्षी रविवारी आपल्या लग्नाचा अकरावा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या जवळच्या मित्रांनी त्यांना सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. स्वतः धोनीने आपली पत्नी साक्षीला एक विंटेज कार भेट म्हणून दिली. त्या कारचे एक छायाचित्र साक्षीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवरून शेअर करताना, ‘थँक्यू फॉर एनिवर्सरी गिफ्ट’ असे कॅप्शन दिले.
धोनी आणि साक्षी यांनी ४ जुलै २०१० रोजी अचानकपणे कोणालाही न कळवता आपल्या जवळच्या मित्रांच्या व कुटुंबाच्या उपस्थितीत विवाह केला होता. त्यांना २०१५ मध्ये झिवा नावाचे कन्यारत्न प्राप्त झाले.

धोनी आहे कार आणि बाईक लव्हर
एमएस धोनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच कार आणि बाईक लव्हर म्हणून ओळखला जातो. धोनीकडे ७० पेक्षा जास्त बाईक असल्याचे सांगितले जाते. अनेकदा तो रांची येथील रस्त्यांवर बाईक चालवताना दिसून येतो. त्याच्या फार्महाऊसवर असलेल्या कारच्या कलेक्शनमध्ये पोर्श ९११, पोंटियाक फायरबर्ड ट्रांस एएम व फेरारी ५९९ जीटीओसह अनेक लग्जरी कार आहेत. ज्यामध्ये निसान जोंगा, जीप ग्रँड चेरोकी ट्रकहॉक, लँडरोवर फ्रीलांडर २ और ऑडी क्यू ७ या गाड्यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आमच्या अनुभवापुढे तुमचा टिकाव तरी लागेल?’; धवनसेनेला कमी लेखणाऱ्या रणतुंगाला चोप्राचे खडेबोल
‘एक बार परदा हटा दे शराबी’ गाण्यावर थिरकली शमीची मुलगी; सहकारी म्हणाला, ‘शानदार बेबो’
Video: पंचांकडून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजावर अन्याय? डिविलियर्स अन् स्टेनही चकित






