भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनी हा सुरुवातीच्या काळात आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. लांबच लांब षटकार मारणाऱ्या धोनीला कसोटी क्रिकेटमध्ये देखील आक्रमक फलंदाजी करताना पाहिले गेले आहे. धोनीने आपल्या १५ वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत शोएब अख्तर आणि डेल स्टेन सारख्या वेगवान गोलंदाजांचा अनेकदा सामना केला आहे. तसेच २००६ मध्ये माजी भारतीय कर्णधाराचा सामना अँड्र्यू फ्लिंटॉफ सोबत झाला होता.त्यावेळी अँड्र्यू फ्लिंटॉफ धोनी समोर वेगवान बाऊन्सर चेंडूचा मारा करत होता. त्यावेळी अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि धोनी या दोघांमध्येही चुरशीची लढत पाहायला मिळाली होती.
तर झाले असे की, भारत आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये २००६ मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना खेळला जात होता. त्यावेळी एमएस धोनी (MS Dhoni) राहुल द्रविड (Rahul Dravid) याच्यासह फलंदाजी करत होता. तेव्हा अँड्र्यू फ्लिंटॉफ गोलंदाजी करण्यासाठी आला होता.
अँड्र्यू फ्लिंटॉफने येताच वेगवान बाऊन्सर चेंडूने धोनीचे स्वागत केले होते. फ्लिंटॉफने टाकलेला एक चेंडू धोनीला कळालाच नाही आणि तो थेट धोनीच्या हेल्मेटला जाऊन धडकला होता. तो चेंडू हेल्मेटला लागल्यानंतर धोनीने हेल्मेट देखील काढला होता. (Ms dhoni gives epic reply after being hit on the Helmet by the Andrew Flintoff bouncer)
धोनी लवकर मैदानावर आपल्या भावना व्यक्त करत नाही, तो त्याचे उत्तर आपल्या बॅटने देत असतो. ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखला जाणारा धोनी मैदानावर खूप शांत दिसून येतो. पहिला चेंडू धोनीच्या हेल्मेटला लागल्यानंतर पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्लिंटॉफने बाऊन्सर चेंडू टाकला. परंतु यावेळी धोनी तयार होता. धोनीने त्या बाऊन्सरला जोरदार प्रत्युत्तर दिले. चेंडू बॅटला लागताच तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता.
फ्लिंटॉफने या सामन्यात दोन्ही डावात मिळून ४ गडी बाद केले होते. याच कामगिरीच्या जोरावर त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ चा पुरस्कार देण्यात आला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
एका शतकासह सूर्यकुमारने बदलले टी२० रँकिंगचे गणित, रोहित-इशानलाही मागे सोडत ठरला ‘दादा’
किती गोड! रोहित शर्माने ‘त्या’ चिमुकलीची भेट घेत जिंकली मने, चॉकलेट आणि टेडीही दिला भेट