कोणत्याही क्रिकेट संघाला पुढे नेण्याचे काम संघनायक करतो. संघातील खेळाडूंच्या निवडीपासून ते सामना विजयापर्यंत, अशा सर्व गोष्टींमध्ये त्याचा हात असतो. परंतु बऱ्याचदा संघ प्रशिक्षक किंवा निवड समिती यांच्या निर्णयांशी कर्णधार असहमत असल्यास त्यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळते. भारतीय संघाच्या दिग्गज कर्णधारांपैकी एक असलेला एमएस धोनी याने त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाला भरघोस यशप्राप्ती करुन दिली आहे. परंतु काही निर्णयांवरुन धोनी आणि निवडकर्त्यांमध्ये वाद झाल्याचेही पाहायला मिळाले आहे.
असाच एक प्रसंग धोनीचा संघ सहकारी आणि माजी भारतीय क्रिकेटपटू आरपी सिंग याने सांगितला होता. नेतृत्त्वपदाचा कार्यभार हाती घेतल्याच्या केवळ एका वर्षानंतर धोनीने हे पद सोडून टाकण्याची धमकी दिली असल्याचे त्याने सांगितले होते.
माध्यमांतील वृत्तांनुसार, २००८ साली भारतीय संघाच्या निवड समितीची बैठक सार्वजनिक झाली होती. यावेळी वेगवान गोलंदाज आरपी सिंगच्या जागी इरफान पठाणला खेळवावे, असे निवड समितीचे म्हणणे होते. परंतु धोनी या निर्णयाच्या विरोधात होता. या निर्णयावरुन झालेली चर्चा बैठकीच्या बाहेर पसरली होती.
यासंदर्भात एका मुलाखतीत बोलताना आरपी सिंगने सांगितले होते की, “धोनी एक असा कर्णधार होता, जो संघ निवडीमध्ये कधीही पक्षपात करत नसे. तो संघ निवडीवेळी कोण त्याचा मित्र आहे आणि कोण जवळचा व्यक्ती आहे, या गोष्टींना अजिबात डोक्यात ठेवत नसे. तो नेहमीच प्रतिभाशाली खेळाडूंना खेळवण्यास प्राधान्य देत असायचा. त्याच्या तटस्थ निर्णय घेण्याच्या स्वभावानेच त्याला यशस्वी कर्णधार बनवले आहे.”
यावरुन दिसून येते की, आरपी सिंगऐवजी इरफान पठाणला निवडण्याच्या निर्णयात धोनी निवडकर्त्यांच्या विरोधात होता. त्यांनी धोनीच्या मनाविरुद्ध हा निर्णय घेण्याचे म्हटले असल्याने त्यावेळी वैतागून धोनीने कर्णधारपद सोडण्याचे भाष्य केले असावे.
महत्त्वाच्या बातम्या-
धवनला कर्णधार बनवल्याने माजी खेळाडू नाखुश; म्हणे, ‘तो ३१ वर्षीय खेळाडू होता पात्र’
‘नेट गोलंदाज म्हणून श्रीलंकेला गेल्यास आनंदी असतो,’ चेतन सकारियाचे लक्षवेधी वक्तव्य
विक्रमात सचिनच्या पुढे होता ‘हा’ खेळाडू, परंतु चर्चा व्हायची ड्रग्ज घेण्याची