दुबई। आज (28 सप्टेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश संघात एशिया कप 2018 चा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला वनडे क्रिकेटमधील एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
त्याने आज जर 87 धावा केल्या तर तो भारताकडून खेळताना वनडेत 10 हजार धावा करणारा चौथाच क्रिकेटपटू ठरणार आहे. याआधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड़ यांनी या पराक्रम केला आहे.
भारताकडून वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर असून त्याने 463 वनडे सामन्यात 18426 धावा केल्या आहेत. तर धोनी या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने भारताकडून वनडेत 323 सामन्यात 50.31 च्या सरासरीने 9913 धावा केल्या आहेत.
तसेच धोनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 326 वनडे सामने खेळले आहेत. त्यातील 3 वनडे सामने हे आशियाई एकादश संघाकडून खेळला आहे. या तीन सामन्यात मिळून त्याने 174 धावा केल्या आहेत.
त्यामुळे याआधीच त्याने वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला आहे. पण भारताकडून अजून त्याला हा टप्पा गाठण्यासाठी 87 धावांची गरज आहे.
भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू-
18426 धावा – सचिन तेंडुलकर (463 सामने)
11221 धावा – सौरव गांगुली (308 सामने)
10768 धावा – राहुल द्रविड (340 सामने)
9913 धावा – एमएस धोनी (323 सामने)
9779 धावा – विराट कोहली (211 सामने)
महत्त्वाच्या बातम्या-
–टाॅप ५- भारत विरुद्ध बांगलादेश एशिया कपमधील या आहेत टाॅप खेळी
–बांगलादेशने कंबर कसली; आकडेवारी मात्र भारताच्या बाजूने
–खराब फाॅर्ममध्ये असलेल्या धोनीला गावसकरांचा सल्ला, आधी हे काम कर!