भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याने भारताचे 2007च्या टी20 विश्वचषक, 2011चा वनडे विश्वचषक आणि 2013ची चॅम्पियन्स ट्रॉफी या विजयी आयसीसी स्पर्धांमध्ये नेतृत्व केले. त्यातच त्याचा 2011च्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील तो विजयी षटकार नेहमीच चाहत्यांच्या लक्षात राहिल. तो किती उत्तम फिनिशर आहे, हे अनेक सामन्यांमधून दिसले आहे. त्याच्याकडून अनेक गोष्टी युवा क्रिकेटपटू शिकण्याचा प्रयत्न करतात. मग ती फलंदाजी असो वा विकेटकीपिंग अथवा फिनिशिंग.
आयपीएल 2023चा छोटा लिलाव 3 डिसेंबरला होणार आहे. यामधील सर्वच्या सर्व 10 फ्रॅंचायजींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. राजस्थान रॉयल्सने देखील 9 खेळाडूंना मुक्त केले त्यामध्ये रियान पराग (Riyan Parag) याचा समावेश नाही याचा अर्थ राजस्थानने त्याला संघात कायम ठेवत पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.
पराग आयपीएलचे चार हंगाम खेळला असून हे सर्व हंगाम तो राजस्थानकडून खेळला. त्याने 47 सामने खेळताना 124.88च्या स्ट्राईक रेटने 522 धावा केल्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याला आता रिटेन केल्याने तो आयपीएलचा पाचवा हंगाम खेळण्यास सज्ज आहे.
परागने म्हटले, “टी20 क्रिकेट खेळणे तितके सोपे नाही, कारण तुम्हाला फलंदाजीला येताच लवकरात लवकर सेट व्हावे लागते. त्यातच क्रमांक सहा आणि सातवर फलंदाजी करणे सर्वात कठीण. येथे केवळ काहीच खेळाडू या क्रमांकावर फलंदाजी करण्यास अग्रेसर आहेत. यामध्ये एमएस धोनीच एक असा खेळाडू आहे, ज्याच्याकडे ती कला आहे. सध्या मी माझ्या कारकिर्दीला सुरूवात करत असून अनेकजण म्हणत असतील मी इतक्या लवकर हे का बोलत आहे, पण हे बरोबर आहे. संघ माझ्यावर विश्वास दाखवत आहे हे महत्वाचे आहे.”
परागने 2022च्या आयपीएलमध्ये 17 डावांमध्ये खेळताना 183 धावा केल्या. त्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. हे सत्र विशेष ठरले कारण मागील दोन हंगामात त्याची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्याने 2020च्या हंगामातील 12 सामन्यात 86 आणि त्याच्या पुढच्या हंगामातील 11 सामन्यात 93 धावा केल्या होत्या. तो राजस्थानकडून सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. MS Dhoni has mastered in Finishing Said Riyan Parag
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
घटस्फोटाच्या बातम्या येत असतानाच सानिया मिर्झाची पोस्ट व्हायरल, म्हणाली, ‘मनावर दडपण…’
क्रिकेटविश्वावर शोककळा! दिग्गज क्रिकेटपटूचे निधन, नशेच्या व्यसनाने उद्ध्वस्त केलं करिअर






