क्रिकेट विश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. वेस्ट इंडिजचे माजी यष्टीरक्षक फलंदाज डेविड मरे यांचे शनिवारी (दि. 26 नोव्हेंबर) निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. ब्रिजटाऊन येथे आपल्या राहत्या घराच्या बाहेर असताना खाली पडून त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर चाहते दु:ख व्यक्त करत आहेत.
डेविड मरे (David Murray) यांचा जन्म 29 मे, 1950 रोजी बार्बाडोसच्या ब्रिज टाऊन येथे झाला होता. त्यांनी वेस्ट इंडिज संघाकडून 1970मध्ये पदार्पण केले होते. मरे हे वेस्ट इंडिजचे महान आणि 1950च्या दशकातील सर्वात शानदार फलंदाजांपैकी एक सर एव्हर्टन वीक्स यांचे मुलगे होते. वीक्स यांनी त्यांच्या फलंदाजीने वेस्ट इंडिज क्रिकेटला शिखरावर नेण्याचे काम केले होते. त्यांच्या नावावर असे विक्रम आहेत, जे 60-70 वर्षांनंतरही कायम आहेत.
Very sad to hear this morning of the passing of David Murray. Extremely talented, highly liked, was undoubtedly a tormented soul after the South Africa tours in 1983 and 1984. RIP Dread. pic.twitter.com/aIoQsJztG9
— Rohan Kallicharan (@ro_jito) November 26, 2022
पदार्पणापूर्वी 1975-76मध्ये, जेव्हा ते वेस्ट इंडिज संघासोबत पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले होते, तेव्हा त्यांच्या नशेच्या व्यसनाबाबत खुलासा झाला होता. मरे गां’जाचे सेवन करायचे. त्यामुळे त्यांना अनेकदा दौऱ्यातून परत पाठवले गेले होते.
Former West Indies wicketkeeper David Murray passed away after collapsing outside his home in Bridgetown
— SSN (@sankar_sinny18) November 26, 2022
डेविड मरे यांची कारकीर्द
उजव्या हाताच्या डेविड मरे यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत वेस्ट इंडिज संघाकडून 19 कसोटी सामने आणि 10 वनडे सामने खेळले. त्यात त्यांनी कसोटीत 601 धावा चोपल्या, तर वनडेत 45 धावा केल्या. त्यांच्या देशांतर्गत क्रिकेटबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी 114 प्रथम श्रेणी सामने खेळले. तसेच, अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 49 सामने खेळले. यावेळी त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 4503 धावा केल्या होत्या, तर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्यांनी 627 धावा चोपलेल्या.
फलंदाजीव्यतिरिक्त त्यांच्या यष्टीमागे घेतलेल्या झेलांबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी कसोटीत 57, वनडेत 16, प्रथम श्रेणीत 293 आणि अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 68 झेल घेतले आहेत. विशेष म्हणजे, गरिबीत दिवस काढणाऱ्या मरे यांना व्यसनाची सवय शेवटच्या श्वासापर्यंत कायम असल्याचे म्हटले जात आहे. (former west indies wicket keeper died drug addiction ruined his career)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अय्यरने केली टीकाकारांची बोलती बंद! म्हणाला, ‘आता काय थेट टी20 मोडमध्ये…’
हॅमिल्टनमध्ये भारतीयांची निराशा होणार? शिखर धवनकडून असतील खूप अपेक्षा





