भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी जवळपास वर्षभरानंतर मैदानावर उतरला. त्याला पाहण्यासाठी लाखो चाहत्यांनी स्टेडिअममध्ये हजेरी लावली होती. या क्रिकेटप्रेमींनाही धोनीने नाराज केले नाही. धोनीने चाहत्यांना खणखणीत षटकाराचे दर्शन दिले. 41 वर्षांच्या वयातही धोनीच्या ताकदीचा नजारा आयपीएल 2023 हंगामाच्या पहिल्या सामन्यात पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, धोनीने सामन्यात एकच षटकार मारला, पण त्यामुळे त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.
झाले असे की, गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेऊन चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी चेन्नईने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 178 धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात चेन्नईसाठी सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने सर्वाधिक 92 धावांचे योगदान दिले. त्याच्याव्यतिरिक्त मोईन अली (23) आणि शिवम दुबे (19) यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते. यानंतर एमएस धोनी (MS Dhoni) आयपीएल कारकीर्दीत पहिल्यांदाच आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. यावेळी धोनीने 7 चेंडूत नाबाद 14 धावा केल्या. या धावा करताना त्याने जोशुआ लिटलच्या 20व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर चौकार मारला.
Time to bring on the shine! 💫#GTvCSK #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/azVgAO7hG9
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 31, 2023
धोनीचा विक्रम
एमएस धोनी याने यावेळी एकच षटकार मारला, पण त्या षटकारामुळे त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. धोनी आयपीएलमध्ये शेवटच्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. धोनीने आतापर्यंत 20व्या षटकात 53 षटकार मारले आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानी कायरन पोलार्ड आहे. पोलार्डने आयपीएलमध्ये 20व्या षटकात आतापर्यंत 33 षटकार मारले आहेत.
कायरन पोलार्डनंतर तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्स संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा आहे. जडेजाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 20व्या षटकात 26 षटकार खेचले आहेत. यानंतर चौथ्या स्थानी हार्दिक पंड्या असून त्याने आतापर्यंत 25 षटकार मारले आहेत. (MS Dhoni has Most sixes smashed in the 20th over in IPL)
आयपीएलमध्ये 20व्या षटकात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
एमएस धोनी- 53 षटकार*
कायरन पोलार्ड- 33 षटकार
रवींद्र जडेजा- 26 षटकार
हार्दिक पंड्या- 25 षटकार
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऋतुराजच्या बॅटमधून निघाली IPL 2023ची पहिली फिफ्टी, मागील 15 हंगामातील पहिले अर्धशतक करणारे खेळाडू कोण?
पुणेकर ऋतुराजचा अहमदाबादेत राडा! अवघ्या 23 चेंडूत फिफ्टी ठोकत केला ‘हा’ खास पराक्रम, बातमी वाचाच