भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला सर्वांची मदत करण्यासाठी ओळखले जाते. धोनीच्या या स्वभावाबद्दल बोलताना भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत म्हणाला की, धोनी नेहमी खेळाडूंची मदत करतो. परंतु पूर्ण समस्या काय आहे हे सांगत नाही. कारण त्याला वाटते की, खेळाडूने स्वत:वर अवलंबून राहिले पाहिजे.
पंतने आपल्या आयपीएल फ्रंचायझी दिल्ली कॅपिटल्स संघाच्या इंस्टाग्राम लाईव्हदरम्यान सांगितले की, “धोनी माझ्यासाठी मैदानावरही आणि मैदानाच्या बाहेरही एका प्रशिक्षकाप्रमाणे आहे. मी कोणत्याही समस्येसाठी त्याच्याकडे मदत मागू शकतो. परंतु तो केव्हाही माझ्यातील संपूर्ण चूका सांगत नाही.”
भारतीय संघाकडून १३ कसोटी सामने, १६ वनडे सामने आणि २८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारा पंत म्हणाला की, “धोनीचे असे करण्यामागील कारण म्हणजे, त्याला असे वाटते की, मी त्याच्यावर अवलंबून राहिले नाही पाहिजे. तो मला समस्येवर स्वत: उपाय शोधण्याचा इशारा देतो. तसेच मला त्याच्याबरोबर फलंदाजी करायला आवडते. परंतु नेहमी असे होत नाही.
पंत पुढे म्हणाला की, “जर धोनी खेळपट्टीवर उपस्थित असेल तर तुम्हाला माहिती असते की परिस्थिती आटोक्यात आहे. त्याच्या डोक्यात गोष्टी सुरु असतात. ज्याचे आम्हाला फक्त पालन करायचे असते.”
धोनी मागील वर्षी जुलैमध्ये वनडे विश्वचषकात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यानंतर एकही क्रिकेटचा सामना खेळताना दिसला नाही. तरीही तो आयपीएलमधून तब्बल ९ महिन्यांनंतर पुनरागमन करणार होता. परंतु कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचे आयोजन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे धोनीच्या पुनरागमनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-गांगुलीला बीसीसीआयचा गाडा हाकण्यासाठी मिळणार हा डेप्युटी, आहे क्रिकेट प्रशासनाचा मोठा अनुभव
-नशीब चांगले म्हणून टीम इंडियाला मिळणार तब्बल ७ कोटी रुपये?
-कसोटी क्रिकेटमधील आजपर्यंतची सार्वकालिन आयसीसी क्रमवारी, पहिल्या विसात केवळ एक तर तिसात दोन भारतीय