शारजाह। चेन्नई सुपर किंग्सने गुरुवारी (३० सप्टेंबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ च्या ४४ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा ६ विकेट्सने पराभव केला. २० व्या षटकात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने विजयी षटकार ठोकला. यासह चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२१ च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ ठरला. चेन्नईने आत्तापर्यंत ११ सामन्यांपैकी ९ सामने जिंकले आहेत.
धोनीचा विजयी षटकार अन् झिवाचा जल्लोष
या सामन्यात हैदराबादने चेन्नईला १३५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिसने ७५ धावांची सलामी दिली. हे दोघे फलंदाजी करत असताना चेन्नई सहज विजय मिळवेल, असे वाटत होते. मात्र, नंतर जेसन होल्डरच्या शानदार गोलंदाजीमुळे सामन्यात रोमांच आणला होता. ऋतुराजला होल्डरने ४५ धावांवर बाद केले. त्यानंतर त्याने सुरेश रैना (२) आणि डू प्लेसिसला (४१) एकाच षटकात बाद करत चेन्नईला मोठे धक्के दिले.
त्यामुळे अखेरच्या २ षटकात चेन्नईसमोर १२ चेंडूत १६ धावा असे समीकरण होते. यावेळी अंबाती रायडू आणि कर्णधार एमएस धोनी फलंदाजी करत होते. १९ वे षटक टाकण्यासाठी हैदराबादचा कर्णधार विलियम्सनने अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारकडे चेंडू सोपवला. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धोनीने १ धाव काढली. तर दुसऱ्या चेंडूवर रायडूने षटकार ठोकत धावा आणि चेंडूंमधील अंतर कमी केले. पुढे धोनीने षटकाच्या चौथ्या चेंडूवर चौकार ठोकला आणि चेन्नईला विजयाच्या जवळ नेले.
अखेरच्या षटकात चेन्नईला ३ धावांची गरज होती. पण सिद्धार्थ कौलने पहिल्या ३ चेंडूंत केवळ १ धाव दिली होती. पण अखेर चौथ्या चेंडूवर धोनीने खणखणीत षटकार ठोकला आणि स्टेडियममध्ये चेन्नईच्या विजयाचा जल्लोष झाला. यावेळी हा सामना पाहाण्यासाठी धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा देखील उपस्थित होते. धोनीने षटकार मारताच या दोघींनीही जोरदार आनंद साजरा केला. झिवाच्या चेहऱ्यावरील हास्याने अनेकांची मने जिंकली. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
VINTAGE DHONI????????❤️
WAIT FOR ZIVA ????#MSD#ziva#CSKvSRH pic.twitter.com/tfCg3z28wX
— Pushpak Sharma (@Pushpak2500) September 30, 2021
https://twitter.com/itsnot_samhere/status/1443633999084130304
सामना जिंकल्यानंतर रायडू १३ चेंडूत १७ धावांवर आणि धोनी ११ चेंडूत १४ धावांवर नाबाद राहिला. हैदराबादकडून या सामन्यात जेसन होल्डरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर, राशिद खानने १ विकेट घेतली.
.@ChennaiIPL march into the #VIVOIPL Playoffs! ???? ????
The @msdhoni-led unit beats #SRH & becomes the first team to seal a place in the playoffs. ???? ???? #VIVOIPL #SRHvCSK
Scorecard ???? https://t.co/QPrhO4XNVr pic.twitter.com/78dMU8g17b
— IndianPremierLeague (@IPL) September 30, 2021
साहाने दिलेली एकाकी झुंज
या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १३४ धावा केल्या होत्या. हैदराबादकडून वृद्धिमान साहाने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. याशिवाय एकालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. चेन्नईकडून जोश हेजलवूडने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर, ड्वेन ब्रावोने २ विकेट्स घेतल्या. तसेच शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीने हैदराबादविरुद्ध ३ झेल घेत मोठ्या विक्रमाला घातली गवसणी, बाकी कोणी जवळपासही नाही
जस्ट ब्युटीफुल!! ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या चेंडूवर स्म्रीतीचा कडक ‘पुल शॉट’, व्हिडिओ होतोय व्हायरल
अन् चिमुकल्या अगस्त्यने काका कृणालचा मोठ्या पोस्टरवरील फोटो अचूक ओळखला, पाहा व्हिडिओ





