---Advertisement---

जेव्हा माजी कर्णधार एमएस धोनी झाला होता आर्मीमॅन, थेट सियाचीनमध्ये…

On: शनिवार, जुलै 4, 2020 4:07 PM
---Advertisement---

मुंबई । मागील वर्षी झालेल्या विश्वचषकानंतर यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनी क्रिकेटपासून दूर आहे. विश्वचषकानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्याची तयारी करत होता, त्यावेळी धोनी मात्र सियाचीनमध्ये होता.

२०१९ लेफ्टनंट कर्नल धोनी काश्मीरमध्ये सैन्यासोबत ट्रेनिंग घेतला आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त त्याने लडाख येथे तिरंगा देखील फडकवला. आर्मीचा युनिफॉर्म घातलेला धोनी सैन्यदलाच्या जीपमधून जेव्हा उतरला तेव्हा लोकांनी त्याला घेरले होते. 

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनी लडाखमध्ये तिरंगा फडकवल्यानंतर सियाचीन ग्लेशियर येथे गेला. कारण धोनीला सियाचिन बॉर्डरवरील परिस्थिती पाहायची होती.

त्यापूर्वी धोनीने 14 ऑगस्ट रोजी आर्मी हॉस्पिटलला देखील भेट दिली होती. येथे धोनी बराच वेळ भारतीय जवानांशी संवाद साधत होता. मागील वर्षी 31जुलै रोजी त्याचे ट्रेनिंग सुरू झाले होते जे की 15 ऑगस्ट रोजी संपले.

2011 मध्ये टेरिटोरियल आर्मी मध्ये सामील झाल्यानंतर एक दिवस आर्मीच्या फौजीसारखा घालवला. तो जवानांसोबत वॉलीबॉल खेळताना तसेच त्याच्या स्वतःच्या बुटाला पॉलिश करतानाही दिसून आला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---