मेलबर्न। भारताने ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या वन-डे सामन्यात 7 विकेट्ने पराभूत करत तीन सामन्यांची वन-डे मालिका 2-1ने जिंकली आहे. भारताने प्रथमच ऑस्ट्रेलियामध्ये द्विपक्षीय मालिका जिंकत इतिहास घडवला आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 231 धावांचा लक्षाचा पाठलाग करताना भारताकडून यष्टीरक्षक एमएस धोनीने 114 चेंडूत नाबाद 87 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आहे. यावेळी त्याला केदार जाधवने नाबाद 61 आणि आणि कर्णधार विराट कोहलीने 46 धावा करत योग्य साथ दिली.
धोनीने या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करत टिकाकारांची तोंडे बंद केली आहेत. त्याने 193च्या सरासरीने 193 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
त्याने या वनडे मालिकेत पहिल्या सामन्यात 51 आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद 55 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला असून हा त्याचा सातवा मालिकावीर पुरस्कार ठरला आहे.
धोनीने वनडेत सर्वाधिक वेळा मालिकावीर पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत विराट कोहली, युवराज सिंग, सौरव गांगुली यांच्या 7 मालिकावीर पुरस्कारांची बरोबरी केली आहे.
त्यामुळे तो आता या क्रिकेटपटूंसह या यादीत संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत 15 मालिकावीर पुरस्कारांसह सचिन अव्वल क्रमांकावर आहे.
त्याचबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये वनडेत 1000 धावांचा टप्पा पार करणारा धोनी भारताचा चौथाच क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी भारताकडून सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी हा पराक्रम केला आहे.
धोनीने फलंदाजी बरोबर यष्टीरक्षकाची भुमिका बजावताना 1 झेल आणि 2 यष्टीचीत केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–एमएस धोनीच्या शानदार खेळीने रिकी पॉंटींगचाही विक्रम मोडीत
–या दिग्गजांच्या यादीत एमएस धोनीचे नाव सन्मानाने घेतले जाणार
–टीम इंडियाचा नादच खूळा! कोणत्याही संघाला जमले नाही ते करुन दाखवले