---Advertisement---

“धोनी जर खेळणार नसेल, तर त्याने मेंटर किंवा कोच व्हावं”

MS-Dhoni
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी फारशी बरी झालेली नाही. त्यांचे १२ सामन्यांनंतरच प्लेऑफमधील पोहचण्याच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. या हंगामाच्या आधी चेन्नईने एमएस धोनी याच्याऐवजी रविंद्र जडेजा याच्याकडे कर्णधारपद सोपवले होते. पण, जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईची कामगिरी चांगली झाली नाही, अखेर त्याने ८ सामन्यांनंतर पुन्हा धोनीकडे कर्णधारपद सोपवले. मात्र, एकूणच संघाची कामगिरी चांगली झाली नसल्याने सध्या त्यांच्यावर टीका होत आहे. आता याबद्दल पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 

धोनीची यंदा चांगली कामगिरी
चेन्नई सुपर किंग्सची (CSK) आयपीएलच्या १५ व्या हंगामात (IPL 2022) खास कामगिरी झालेली नसली, तरी धोनीने (MS Dhoni) वैयक्तिकरित्या चांगली कामगिरी केली आहे. त्याने १२ सामन्यांत ३८.८० च्या सरासरीने १९९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे.

धोनीने बनावं मेंटर – शोएब अख्तर
शोएब अख्तर (Shoaib Akhtar) म्हणाला आहे की, धोनी चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) मार्गदर्शकाची किंवा प्रशिक्षकाची भूमिका निभावू शकतो. तो स्पोर्ट्सकिडाशी बोलताना म्हणाला, ‘जर त्याला वाटत असेल, तर तो पुढच्या हंगामात खेळणे सुरू ठेवू शकतो. पण, जर तो खेळणार नसेल, तर तो मार्गदर्शक किंवा प्रशिक्षकाच्या भूमिकेत परत येऊ शकतो. ही त्याच्यासाठी वाईट भूमिका नसेल. पण हे सर्व धोनीवर अवलंबून आहे. तो एक मौल्यवान व्यक्ती आहे. तो संघामध्ये असो किंवा संघाबरोबर.’

तसेच शोएब अख्तर म्हणाला, ‘चेन्नई व्यवस्थापन यावेळी गंभीर दिसत नाही. कर्णधारपद जडेजाकडे का गेले, आपल्याला माहित नाही. पण, त्यांना पुढील हंगामात स्पष्ट विचांरांनी परत यायला हवे.’

इतकेच नाही, शोएब अख्तर पुढे म्हणाला, ‘धोनी आता कदाचीत फक्त अजून एक गाणे वाजवू शकतो आणि आपल्या निवृत्तीची घोषणा करू शकतो. कोणी खरंतर भविष्यवाणी करू शकत नाही की तो काय करेल. तो तसाच व्यक्ती आहे. जर त्याला वाटत असेल की, त्याला निवृत्ती घ्यायची आहे, तर तो असे करेल. खरं सांगायचे झाले, तर काही खेळाडूंची वेळ आली आहे. फ्रँचायझी क्रिकेटमध्ये जर आणि पण अशा गोष्टी नसतात.’

या आयपीएल हंगामात चेन्नईने १२ पैकी ४ सामने जिंकले आहेत. तसेच ८ सामने पराभूत झाले आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

‘मी बोललोय त्याच्याशी…’, अंबाती रायुडूने रिटायरमेंटचे ट्वीट डिलीट केल्यानंतर सीएसकेच्या सीईओंचे स्पष्टीकरण

जॉनी बेअरस्टोने डावाच्या दुसऱ्याच षटकात हेजलवूडला चोपले २ गगनचुंबी षटकार, पाहून विराटही झाला हँग

“मी निवडकर्ता असतो, तर दिनेश कार्तिकला टी२० विश्वचषकासाठी नक्कीच संधी देईल”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---