आयपीएल 2021 स्पर्धा पुढे ढकलल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी रांची येथील आपल्या घरी वेळ घालवत आहे. भारतीय संघाच्या या माजी कर्णधाराची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकतीच क्रिकेटप्रेमींची ही इच्छा साक्षी धोनीने पूर्ण केली आहे. साक्षी अनेकदा धोनीचे व्हिडिओ व फोटो तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर अपलोड करत असते. आयपीएल पुढे ढकलल्यानंतर प्रथमच धोनी एका व्हिडिओमध्ये दिसला आहे. साक्षीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये धोनी आपली मुलगी झिवा आणि कुत्र्यासोबत दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी रांची येथील आपल्या घरी राहत आहे. येथे त्याचे मोठे फार्महाऊस आहे. धोनी फार्महाऊसमध्ये सेंद्रिय शेती देखील करतो, ज्यांची उत्पादने बाजारात येत आहेत. याशिवाय धोनीला बाईकचीही फार आवड आहे. अलीकडेच धोनीच्या घरी एक नवीन पाहुणाही आला आहे. साक्षीनेच सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती की चेतक नावाचा घोडा त्यांच्या घरी आला आहे.धोनीच्या घरात आधीपासूनच बरेच कुत्री आहेत आणि आता चेतक घोडाही कुटुंबामध्ये सामील झाला आहे.
आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग स्वतः फलंदाजीत फारशी चांगली कामगिरी करू शकला नसला, तरी त्याच्या नेतृत्व क्षमतेमुळे सीएसकेला मागील वर्षाच्या खराब कामगिरीतून सावरत यावर्षी शानदार कामगिरी करण्यात मदत झाली. गेल्या हंगामात सीएसके संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर होता, आणि प्लेऑफमध्ये ते प्रथमच स्थान मिळवू शकले नव्हते. परंतु यावर्षी स्पर्धा स्थगित करण्यापूर्वी सीएसके 7 सामन्यांमध्ये 5 विजयांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान होते.
दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे आयपीएल 2021 स्पर्धा रद्द करण्यात आली असली, तरी सर्व चाहत्यांना अशा असेल की ही स्पर्धा लवकरच सुरू होईल. अनेक क्रिकेट पंडितांच्या मते धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो व त्यामुळेच चेन्नई सुपर किंग संघाचे समर्थक मोठ्या आशेने आयपीएल स्पर्धा सुरू होण्याची वाट बघत असतील.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! भारताच्या अव्वल गोलंदाजांच्या वडिलांचे निधन, यकृताच्या कर्करोगाने होते त्रस्त
आधी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत अडवला चेंडू, नंतर स्वत:च फेकला सीमारेषेबाहेर! पाहा विनोदी व्हिडिओ
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जिंकणे या खेळाडूविना आहे अशक्य, पाहा काय सांगतायेत आकडे