मुंबई। रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात चेन्नईने हैद्राबादवर ८ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबर चेन्नईला आयपीएलमधील तिसरे विजेतेपदही मिळाले.
याबरोबर आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी संघ होण्याचा मान मुंबईकडून चेन्नईकडे आला. याला कारण म्हणजे जरी हे दोन्ही संघ प्रत्येकी ३ वेळा विजेतेपदं जिंकले असले तरी चेन्नईने तब्बल ७ फायनल तर मुंबईने ४ फायनल खेळल्या आहेत.
चेन्नईने जी तिन विजेतेपदं जिंकली आहेत ती कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली. शिवाय ज्या ७वेळा अंतिम फेरी गाठली ती देखील धोनीच्याच नेतृत्वाखालीच.
तसेच चॅम्पीयन लीगमध्येही त्याने या संघाला दोन विजेतेपदं जिंकुन दिली आहेत. २०१० आणि २०१४मध्ये त्याने ही विजेतेपदं जिंकुन दिली होती.
यामुळे त्याने चेन्नईला ११ वर्षांत ५ विजेतेपद, एकुण ९ फायनल केवळ धोनीच्याच नेतृत्वाखाली केले आहे. त्यामुळे धोनीच या संघाचा खरा किंग आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-धोनी ते वाक्य बोलला आणि चेन्नईच्या चाहत्यांच्या डोळ्यात आले पाणी !
–धोनीबद्दल रैना जे बोलला ते खरे करुन दाखवले!
–सलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू
–म्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन
–जेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप झाली पक्की