भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी चेन्नई सुपर किंग्सचा (सीएसके) कर्णधार एमएस धोनीविषयी मोठे विधान केले आहे. जेथील खेळपट्टी स्लो आणि टर्निंग असते, तिथे धोनीपेक्षा इतर कोणताही कर्णधार श्रेष्ठ असू शकत नाही, असे मांजरेकरांनी म्हटले आहे. MS Dhoni Is The Best Captain On Slow And Turning Pitches
मांजरेकर यांच्या मते, सीएसकेकडे आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळण्यासाठी पियूष चावला, रविंद्र जडेजा, इमरान ताहिर आणि मिचेल सेंटनर यांच्यासारखे दमदार फिरकीपटू उपलब्ध आहेत, जे युएईच्या मैदानावर खूप शानदार प्रदर्शन करु शकतात. या फिरकीपटूंमुळे यंदा सीएसकेला खूप फायदा होणार आहे.
हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्रात लिहिलेल्या कॉलममध्ये मांजरेकर म्हणाले की, “जर तुम्ही फिरकीपटूंच्या दृष्टिकोनातून पाहिले तर सीएसकेला खूप फायदा आहे. सीएसकेच्या घरेलू मैदानावरची खेळपट्टीदेखील स्लो टर्नर आहे. त्यामुळे संघाने त्याच खेळाडूंची निवड केली होती. जे त्या मैदानावर दमदार खेळू शकतात. याच कारणामुळे पियूष चावलाची संघात निवड करण्यात आली होती.”
“अशा परिस्थितीत धोनी खूप चांगल्या प्रकारे नेतृत्त्व करु शकतो. स्लो टर्निंग खेळपट्टीवर धोनीपेक्षा चांगला कर्णधार दूसरा कोणीही असू शकत नाही. याव्यतिरिक्त त्याच्याकडे असे भारतीय फलंदाज उपलब्ध आहेत, जे अशा खेळपट्टीवर चांगल प्रदर्शन करु शकतात,” असे त्यांनी पुढे बोलताना म्हटले.
महत्त्वाचे म्हणजे, चेन्नईच्या घरेलू मैदानाप्रमाणे युएईतील मैदानांवरची खेळपट्टीदेखील फिरकीपटूंसाठी सोईस्कर आहे. त्यामुळे ज्या संघाकडे मुबलक प्रमाणात फिरकीपटू उपलब्ध आहेत, तो संघ यंदा तगडे प्रदर्शन करताना दिसू शकतो. सीएसकेव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्स संघाकडेही अनेक दमदार फिरकीपटू उपलब्ध आहेत.
१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सरकारने घेतले दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड ताब्यात, नक्की काय आहे प्रकरण
शाहरुखचा त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघ बनला चौथ्यांदा सीपीएल चॅम्पियन; जाणून घ्या आत्तापर्यंतचे विजेते
एमएस धोनीच्या गावचा पोरगा, जो यंदा करु शकतो चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पण?
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलच्या सर्व ८ संघांच्या सपोर्टिंग स्टाफची संपूर्ण माहिती, घ्या जाणून
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज
स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार लाला अमरनाथ यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी






