लाॅर्ड्स | शनिवारी भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या वनडेत इंग्लंडचा कर्णधार इयान माॅर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सध्या इंग्लंड संघ २६.४ षटकांत २ बाद १६६ धावांवर खेळत आहे.
या सामन्यातील जेव्हा २१वे षटक हार्दिक पंड्या टाकत होता तेव्हा ५ खेळाडू सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करत होते. चाणाक्ष धोनीच्या ध्यानात ही गोष्ट येताच त्याने पंड्या चेंडू टाकण्यापासून रोखले. तसेच लाॅंंग आॅनला उभे असलेल्या खेळाडूला सर्कलच्या आत येण्यासाठी सांगितले.
यामुळे एकप्रकारे धोनीने हार्दिकला नो बाॅल टाकण्यापासून वाचवले तसेच संघासाठी एक धावदेखील वाचवली.
महत्त्वाच्या बातम्या-
-फिफा विश्वचषक: तिसऱ्या स्थानासाठी बेल्जियम – इंग्लंड आज लढणार
-भारताला वनडे मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी