कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 15 एप्रिल 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने यापुर्वीच आयपीएलची जोरदार तयारी सुरु केली होती. तो चेन्नई शहरात दाखल होऊन सरावही करत होता.
त्याने काही सराव सामनेही खेळले होते. विशेष म्हणजे या सराव सामन्याला प्रेक्षक चांगलीच गर्दी करत होते. परंतु आयपीएलच पुढे ढकलल्यामुळे धोनीने चेन्नई शहर सोडले आहे.
गेल्या वर्षी भारतीय संघाचा विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर धोनी क्रिकेटपासून दूरच होता. धोनीचे चाहतेही त्याचा खेळ पहाण्याची आतुरतेने वाट पहात होते.
अशातच धोनी आयपीएल खेळणार म्हटल्यावर चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह होता. धोनीने जोरदार तयारी केली होती. सीएसकेच्या सोशल मीडियावरुन याच्या रोज अपडेट्स दिल्या जात होत्या. यामुळे सराव सामन्यालाही चाहते गर्दी करत होते.
परंतु आता या सगळ्याच आनंदावर विरजन आले आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआय आणि विविध फ्रचाईजीच्या मालकांची मुंबईमध्ये मिटींग आयोजीत करण्यात आली आहे. यानंतर लीगचा पुढील नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
ट्रेडिंग बातम्या-
– यावेळी आयपीएलचे असे काही आयोजन होणार की प्रेक्षकही होतील थक्क
– आयपीएलच्या इतिहासात हे असे पहिल्यांदाच घडणार?




