---Advertisement---

चेन्नईच ट्विटर किंग्ज! आयपीएलमधील खराब कामगिरी नंतरही धोनीची CSK ‘या’ बाबतीत अव्वल

On: गुरूवार, नोव्हेंबर 19, 2020 12:34 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम यूएई येथे पार पडला. या हंगामात एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले नाही. एवढेच नव्हे, तर हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी राहिला होता.

असे असले तरी आयपीएलच्या 13 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाबद्दल सर्वाधिक ट्विट केले गेले. प्रसिद्धीच्या बाबतीत सीएसके इतर सर्व संघांच्या तुलनेत वरचढ ठरला आहे. सीएसकेनंतर ट्विटरवर सर्वाधिक ट्विट विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाबाबत केले गेले.

बंगलोर पाठोपाठ मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्सचा क्रमांक लागतो.

मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याने मारली बाजी

तसेच आयपीएलच्या 13 व्या हंगामातील सामन्याबद्दल बोलायचे झाले तर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघात खेळलेल्या पहिल्या सामन्याबद्दल ट्विटरवर सर्वाधिक चर्चा झाली. या सामन्यापाठोपाठ 4 ऑक्टोबरला झालेल्या मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्याबद्दल चर्चा झाली.

त्याचबरोबर खेळाडूंच्याबाबत या स्पर्धेदरम्यान विराट कोहलीबद्दल सर्वाधिक ट्विट करण्यात आले.

सचिनचा ट्विट ठरला गोल्डन ट्विट 

याबरोबरच आयपीएल 2020 मधील गोल्डन ट्विट करण्याचा मान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मिळाला. त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज निकोलस पूरनच्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध केलेल्या शानदार क्षेत्ररक्षणाचे कौतुक करणारा ट्विट केला होता, हाच ट्विट गोल्डन ट्विट ठरला आहे. या ट्विटला जवळपास 25 हजार रिट्विट्स आले आहेत.

चेन्नईची 2020 हंगामातील खराब कामगिरी 

आयपीएल 2020 मध्ये चेन्नईने चौदा सामने खेळले आहेत. यामध्ये या संघाने 6 सामन्यात विजय मिळवला, तर 8 सामन्यात या संघाला पराभवाला सामोरे जावं लागलं.

आयपीएलच्या इतिहासात चेन्नईने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली तीन वेळा किताब जिंकला आहे. सन 2010 आणि 2011 या सलग दोन वर्षात किताब जिंकणारा सीएसके हा पहिला संघ होता. त्यानंतर या संघाने 2018 साली पुन्हा एकदा किताबावर नाव कोरले. तसेच चेन्नईने 2008 ते 2019 पर्यंत खेळलेल्या सर्व आयपीएल हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. मात्र यंदा पहिल्यांदाच चेन्नई संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरला.

महत्त्वाच्या बातम्या –

विराट नाही, तर ‘या’ भारतीय फलंदाजाची विकेट अधिक मूल्यवान, भारताविरुद्धच्या सामन्याआधी हेझलवूडचे वक्तव्य

विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माला मिळायला हवे कसोटी कर्णधारपद, माजी दिग्गजाचे मोठे भाष्य

आनंदाची बातमी! राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश, ‘हे’ संघ खेळणार स्पर्धा

ट्रेंडिंग लेख –

…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात

हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश

पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---