---Advertisement---

IPL 2023 | चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, महत्वाच्या सामन्यांमधून धोनी घेऊ शकतो माघार

On: शुक्रवार, जानेवारी 20, 2023 12:11 PM
Moeen-Ali-And-MS-Dhoni
---Advertisement---

आयपीएल 2023 हंगाम चेन्नई सुपर किंग्ज आणि त्यांच्या चाहत्यांसाठी विशेष असणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचा प्रत्येक चाहता हा एमएस धोनी याचा देखील तितकाच मोठा चाहता आहे. धोनी मागच्या मोठ्या काळापासून चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळत आला आहे आणि त्याने संघाला आतापर्यंत चार आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत. धोनीसाठी 2023 हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. पण आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबई इंडियन्सपाठोपाठ चेन्नईने सर्वाधिक चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. संघाच्या या यशाचे श्रेय नेहमीच एमएस धोनी (MS Dhoni) याला मिळत आले आहे. धोनी 2008 म्हणजेच आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून सीएसकेचे नेतृत्व करत आला आहे. अशात आयपीएल कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात देखील धोनी चांगले फ्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात असेल. पण आगामी आयपीएल हंगामात सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये धोनी खेळणार नसल्याचे सांगितले जात आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार आगामी आयपीएल हंगामातील पहिल्या चार सामन्यांमध्ये धोनी खेळू शकणार नाही. कारण सध्या त्याची कंबर दुखत असून डॉक्टरांनी त्याला 2 ते 2.5 महिने आराम घेण्याचा सल्ला दिला आहे. माध्यमांतील ही माहिती अचूक असेल तर धोनी आणि सीएसकेच्या चाहत्यांची चांगलीच निराशा होणार, यात शंका नाही.

आयपीएल 2023 साठी सीएसकेची संभावित प्लेइंग इलेवन:
डेवोन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अंबाती रायडू, अजिंक्य रहाणे, मोईन अली, बेन स्टोक्स, एमएस धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, दीपक चाहर, मुकेश चौधरी, महेश थिक्षणा.

आईपीएल 2023 मध्ये सीएसकेसाठी खेळणारे खेळाडू:
यष्टीरक्षक: एमएस धोनी, डेवोन कॉनवे (न्यूजीलंड)
फलंदाज: रुतुराज गायकवाड़, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, शैक रशीद, अजिंक्य रहाणे.
अष्टपैलू: मोइन अली (इंग्लंड), शिवम दूबे, राजवर्धन हैंगरगेकर, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस (दक्षिण आफ्रीका), मिचेल सेंटनर (न्यूजीलंड), बेन स्टोक्स (इंग्लंड), काइल जेमीसन (न्यूजीलंड), अजय मंडल, भगत वर्मा, निशांत सिंधु.
गोलंदाज: दीपक चाहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना (श्रीलंका), सिमरजीत सिंह, प्रशांत सोलंकी, महेश थीक्षणा (श्रीलंका).

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाची गोलंदाजी फोडणारा ‘तुफानी’ ब्रेसवेल आहे तरी कोण? रक्तातच आहे क्रिकेट
पुजाराच्या संघात खेळणार स्मिथ! पाकिस्तानचा उपकर्णधारही दाखवणार सोबतच दम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---