---Advertisement---

खेळाडूला ‘या’ गोष्टीचा अभिमान असावा; धोनीचा नवख्या क्रिकेटर्सला मोलाचा संदेश

On: शुक्रवार, जून 3, 2022 6:35 PM
MS-Dhoni
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी आणि सर्वात यशस्वी कर्णदार महेंद्रसिंग धोनीने नव्याने उद्यास येणाऱ्या खेळाडूंना मोलाचा संदेश दिला आहे. तिरुवल्लूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (टीडीसीए) रौप्य महोत्सवी समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्रसिंग धोनी उपस्थित होता. त्यावेळी त्यानी उपस्थित युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्याच्यासोबत आयसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासनही मंचावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) म्हणाला की, “क्रिकेटपटूंना त्यांच्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटला पाहिजे. कारण, ही सर्वोच्च पातळी गाठण्याची पहिली पायरी आहे. जिल्हा संघटनेच्या यशानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उत्सवाचा मी पहिल्यांदाच भाग होत आहे. याप्रसंगी मी माझ्या जिल्हा क्रिकेट संघटनेचे आभार मानू इच्छितो. क्रिकेटपटूंना त्यांच्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटला पाहिजे. मला माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे, पण मी माझ्या जिल्ह्यासाठी किंवा शाळेसाठी खेळलो नसतो, तर हे शक्य झाले नसते.

धोनीने यावेळी आपल्या कारकिर्दीचा आधार देत क्रिकेट कारकीर्दीत जिल्हा पातळीचे असणारे महत्त्व उपस्थित युवा खेळाडूंना सांगितले. याशिवाय दिलखुलासपणे त्याच्या लहानपणी आणि क्रिकेट कारकिर्दीत मोलाचा वाटा असणाऱ्या रांची जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे आभार मानले. चेन्नई सुपर किंग्जच्या ट्विटर अकाउंटवरून या कार्यक्रमाचा आणि धोनीच्या मार्गदर्शनाचा छोटासा भाग शेअर करण्यात आला आहे.

https://twitter.com/ChennaiIPL/status/1532335023126630400?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1532335023126630400%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-ms-dhoni-said-cricketers-should-be-proud-of-representing-their-district-6584149.html

झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमधून येणारा महेंद्रसिंग धोनी हा देखील आज यशाच्या उच्च शिखरावर पोहोचला आहे. भारतासाठी महेंद्रसिंग धोनी हा आजवरचा सर्वोत्तम कर्णधार असल्याचे म्हटले जाते. धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ साली टी२० विश्वचषक, २०११ साली २८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव रेखाटले आहे. जगात आयसीसीच्या तिन्ही स्पर्धेत विजय मिळवणारा महेंद्रसिंग धोनी हा पहिला आणि एकमेव कर्णधार आहे.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

आयपीएल ट्रॉफी बनवायला चक्क ‘इतके’ कोटी आला होता खर्च, ३० कारागिरांनी मिळून बनवलाय चषक

IPL फायनलसाठी उगाचच नव्हते निवडले नरेंद्र मोदी स्टेडियम, सोयी-सुविधांनी आहे परिपूर्ण

पहिल्या राउंडमध्ये अनसोल्ड राहिलेला डेविड मिलर सगळ्यांनाच पुरून उरला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---