माऊंट मॉनगनुई| भारताचा न्यूझीलंड विरुद्ध तिसरा वन-डे सामना बे ओव्हल मैदानावर आज (28 जानेवारी) पार पडला असून भारताने हा सामना 7 विकेट्सने जिंकला आहे. तसेच 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
या सामन्याला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीला मुकावे लागले. धोनी दुखापतीमुळे किंवा आजारपणामुळे वनडे सामन्यांना मुकण्याची ही केवळ तिसरीच वेळ आहे.
याआधी धोनी 2013 ला विंडीजमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेतील तीन सामन्यांना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळेच मुकला होता. तर त्याआधी 2007मध्ये तो आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या प्रत्येकी एका वनडे सामन्याला तापामुळे मुकला होता.
धोनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून चांगल्या लयीत खेळत आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सलग तीन अर्धशतके केली होती. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत तीन सामन्यात अनुक्रमे 51, नाबाद 55 आणि नाबाद 87 अशा धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता.
तसेच त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यातही 33 चेंडूत नाबाद 48 धावांची आक्रमक खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
–हार्दिक पंड्याच्या पुनरागमनाबाबत विराट कोहलीने केले हे मोठे वक्तव्य
–कर्णधार कोहलीने रिकी पॉंटींगच्या या विक्रमाला दिला धक्का
–न्यूझीलंडमध्ये असा कारनामा करणारा विराट कोहली केवळ दुसराच आशियाई कर्णधार




