इंडियन प्रीमियर लीगच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी सध्या आयपीएल २०२१ च्या तयारीत व्यस्त आहे. त्याचे नेटमध्ये सराव करतानाचे फोटो, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. गतवर्षीच्या निराशाजनक कामगिरीनंतर सीएसके संघ दमदार पुनरागमन करत चौथ्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज होत आहे. अशात धोनीने संन्यास घेतला असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
त्याचे झाले असे की, स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर धोनीचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये धोनी बौद्ध भिक्षूच्या अवतारात दिसत आहे. त्याने आपल्या डोक्यावरील पूर्ण केस कापले आहेत आणि बौद्ध भिक्षूंप्रमाणे पोशाखही धारण केला आहे. याबरोबरच एका जंगलात तो बसल्याचे दिसत आहे. या फोटोनंतर धोनीने संन्यास घेतला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची सुरुवात होण्यापुर्वी धोनीने संन्यास घेतल्याचे पाहून आयपीएलप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एखाद्या जाहिरातीमधील असू शकतो फोटो
असे असले तरीही, धोनीने खरोखरच टक्कल केली असावी आणि संन्यास घेतला असल्याचे स्पष्ट नाही. हा फोटो कोणत्या जाहिरातीचा असू शकतो. कारण धोनी हा क्रिकेटपटूबरोबर प्रसिद्ध ब्रँड अॅम्बेसेडर आहे. तो वेगवेगळ्या वस्तूंच्या जाहिराती करताना दिसतो. याबरोबरच धोनी सध्या चेन्नईमध्ये आपल्या संघ सहकाऱ्यांसह आयपीएल २०२१ ची तयारी करत आहे. त्यामुळे त्याने संन्यास घेणे अशक्य आहे.
१० एप्रिल रोजी होणार सीएसकेचा पहिला सामना
बीसीसीआयने आयपीएल २०२१ चे वेळापत्रकही जाहीर केले आहे. ९ एप्रिल ते ३० मे दरम्यान हा हंगाम पार पडणार आहे. अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या सीएसकेचा या हंगामातील पहिला सामना १० एप्रिल रोजी मुंबईत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे.
???????????? – our faces since we saw #MSDhoni's new avatar that could just break the Internet! ????What do you think is it about? pic.twitter.com/Mx27w3uqQh
— Star Sports (@StarSportsIndia) March 13, 2021
https://twitter.com/HumHayRaj/status/1370779105151488001?s=20
— Jaise_Taise (@Jaise_Taise) March 13, 2021
— ???????????????????? (@LazyySaket) March 13, 2021
The Monk Who Sold His Ferrari :- M.S. Dhoni ???? pic.twitter.com/QA6o51PZWb
— Dharmraj Again ↗️ (@DharmrajAgain) March 13, 2021
This guy is most overrated sportsman ever and post 2013, what a damage he did to Indian cricket
— The Man with no name (@amrtansh) March 13, 2021
चेन्नई सुपर किंग्स – २५ खेळाडू (८ परदेशी)
एमएस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, नारायण जगदीसन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सँटनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, जोश हेझलवुड, आर साई किशोर, सॅम करन, रॉबिन उथप्पा, कृष्णप्पा गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, के भागवथ वर्मा, सी हरी निशांथ, एम हरिशंकर रेड्डी
महत्त्वाच्या बातम्या-
कोण जिंकणार विजय हजारे ट्रॉफी? अंतिम चुरशीसाठी आज मुंबई आणि उत्तर प्रदेश आमने-सामने






