भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी २०२१मध्ये सईद मुश्ताक अली ट्राॅफी स्पर्धेत झारखंड संघाकडून खेळणार आहे. आयपीएलच्या तयारीच्या दृष्टीने तो या स्पर्धेकडे पहात आहे.
स्पोर्ट्सकीडाने दिलेल्या वृत्तानुसार, धोनी हा सध्या नियमितपणे झारखंड क्रिकेट असोशियन अर्थात जेएससीएच्या प्रमुख व इतर सदस्यांच्या संपर्कात आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असलेला धोनी लाॅकडाऊन पुर्वी काही वेळा जेएससीएच्या स्टेडियमवर सराव करताना दिसला होता. तो १४ मार्च रोजी चेन्नईहुन परतला. परंतु चेन्नईला आयपीएल ट्रेनिंग कॅंपला जाण्यापुर्वी धोनी रांचीतील जेएससीएच्या स्टेडियमवर नियमित सराव करत होता.
सुत्रांच्या म्हणण्यानुसार, “तो जेएससीएच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. त्याने सईद मुश्ताक अली स्पर्धेत खेळण्यात रस दाखवला आहे. तो झारखंड क्रिकेटसाठी काहीतरी देऊ इच्छितो. त्याने हा निर्णय लाॅकडाऊन नंतर घेतला आहे व त्याला कोणतीही घाई नाही. तो आयपीएलच्या तयारीच्या दृष्टीने सईद अली मुश्ताक अली स्पर्धेकडे पहात आहे.”
सईद मुश्ताक अली ही देशांतर्गत टी२० स्पर्धा असून ती डिसेंबर व जानेवारी महिन्यात होते. यामुळे आयपीएलच्या तयारीला एक महिन्याचा चांगला वेळ मिळतो. २०१९-२० हंगामात झारखंड संघ या स्पर्धेत सुपर लीग स्टेजला पोहचला होता. परंतु या स्टेजला ४ पैकी ४ सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. २०१७मध्ये धोनी झारखंडकडून विजय हजारे ट्राॅफी स्पर्धेत शेवटचा सामना खेळला होता. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट तर २०१४-१५ हंगामातच सोडले आहे. तसेच धोनी आता अ दर्जाच्या सामन्यातही खेळताना दिसत नाही. त्यामुळे धोनी सध्यातरी केवळ टी२० प्रकारातच रस घेत असल्याचे दिसत आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आणि थेट शिला की जवानी गाण्यावर ऑस्ट्रेलियाच्या वाॅर्नरने व मुलीने धरला ठेका
-फक्त एक आणि एकच टी२० सामना खेळायला मिळालेले ५ भारतीय खेळाडू
-२०१०पासून चौथ्या क्रमांकावर वनडेत सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय