टी-२० विश्वचषक २०२१ च्या १६ सामन्यात रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान संघांचे एकमेकांपुढे आव्हान होते. या सामन्यात पाकिस्तनने भारताचा लाजिरवाणा पराभव केला. भारतीय संघाचा या सामन्यात पराभव झाल्यामुळे अनेक भारतीय चाहत्यांची निराशा झाली. परंतु भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा मेंटॉर महेंद्रसिंग धोनीने या पराभवाची भविष्यवाणी खूप आधीच केली होती. धोनीचा हा जुना व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
महेंद्रसिंग धोनीने २०१६ टी-२० विश्वचषकात या पराभवाची भविष्यवाणी केली होती. धोनी त्यावेळी म्हटला होता की, भारतीय संघ कधी ना कधी विश्वचषकात पाकिस्तानकडून नक्कीच हारेल. आता धोनीची ही भविष्यवाणी खरी ठरली आहे आणि त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. धोनी या व्हिडिओत पाकिस्तानच्या विजयाची अपेक्षा व्यक्त करताना दिसत आहे.
हा व्हिडिओ २०१६ टी-२० विश्वचषकातील एका पत्रकार परिषदेतील आहे. ही पत्रकार परिषद पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतरची असावी. व्हिडिओत भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनी माध्यमांशी बोलत आहे. धोनी म्हणतो की, “आम्हाला अभिमान आहे की, आम्ही विश्वचषकात ११-० ने पुढे आहोत, पण हे देखील खरे आहे की, कधी ना कधी एका टप्प्यावर जाऊन आम्हीही पराभूत होऊ. जरी आज असे झाले नसले तरी, आजपासून १०, २० किंवा ५० वर्षांनी असे नक्की होईल.”
https://twitter.com/mysteriouslywow/status/1452219400145317889?s=20
महेंद्रसिंग धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे आणि तो सध्या भारतीय संघाचा मेंटॉर आहे. संघाला योग्य मार्गदर्शन करण्याची त्याच्यावर जबाबदारी आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर संघाला विश्वचषकात योग्य मार्गावर आणण्याची जबाबदारीही त्याचीच असणार आहे. अशात भारतीय संघ धोनीच्या मार्गदर्शनाखाली विश्वचषकात काय कमाल करून दाखवतो हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लज्जास्पद! भारताच्या पराभवानंतर शमीवर धार्मिक टीका; सहकारी उतरले समर्थनात