जयपूर। आज(11 एप्रिल) आयपीएल 2019 मधील 25 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे. हा सामन्याला रात्री 8 वाजता सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे.
या सामन्यातून चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीला आयपीएलमध्ये इतिहास घडवण्याची संधी आहे. जर या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवला तर हा धोनीचा कर्णधार म्हणून आयपीएलमधील 100 वा विजय असेल.
असे झाले तर आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 100 विजय मिळवणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरेल. धोनीनेआत्तापर्यंत आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 165 सामने खेळले असून त्याने 99 विजय आणि 65 पराभव स्विकारले आहेत.
त्याच्या नावावर आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रमही आहे. या यादीत त्याच्या पाठोपाठ गौतम गंभीर आहे. गंभीरने 129 सामन्यात नेतृत्व करताना 71 सामन्यात विजय मिळवला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार –
99 विजय – एमएस धोनी (सामने 165)
71 विजय – गौतम गंभीर (129 सामने)
54 विजय – रोहित शर्मा (94 सामने)
44 विजय – विराट कोहली (102 सामने)
35 विजय – ऍडम गिलख्रिस्ट (74 सामने)
महत्त्वाच्या बातम्या –