ऑगस्ट २००५ ला पहिल्यांदा ब्रॅडमन ट्वेंटी२० कप स्पर्धा खेळली गेली होती. ही स्पर्धा कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने आयोजित केली होती. टी२० क्रिकेटमधील लीग स्पर्धेची ही पहिली सुरुवात होती.
या स्पर्धेत ६ संघ खेळले होते. यात एअर इंडिया, सर डोनाल्ड ब्रॅडमन XI, केमप्लास्ट, बंगाल क्रिकेट असोसिएशन XI , न्यू साऊथ वेल्स आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशन XI या संघांचा समावेश होता.
या सहा संघांपैकी ब्रॅडमन हा संघ सर्वात वेगळा होता. कारण या संघात एमएस धोनी, डिन जोन्स, शोएब मलिक अशी मोठी नावे होती. विशेष म्हणजे सर्वांना माहित असलेला मधल्या फळीत खेळणारा धोनी या संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी उतरला होता.
त्यावेळी २४ वर्षांचा असलेला आणि भारतीय संघात नवीनच असलेला धोनी पहिल्या सामन्यात कर्नाटक क्रिकेट असोसिएशन विरुद्ध खास कामगिरी करु शकला नव्हता. तो केवळ ३ चेंडूत ५ धावांवर बाद झाला होता.
मात्र त्यानंतर झालेल्या सामन्यात त्याने शानदार कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कार मिळवला. त्याने ब्रॅडमन संघाच्या दुसऱ्या सामन्यात केमप्लास्ट विरुद्ध सलामीलाच फलंदाजी केली. पण यावेळी त्याचा सलामीवीर साथीदार कमरान अकमल होता.
पण कमरान शून्यावर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ सलमान बट १४, शोएब मलिक १७ आणि रसल अरनॉल्ड शून्य धावा करुन बाद झाले. पण धोनीने एक बाजू पूर्णपणे सांभाळताना ६१ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ९१ धावा केल्या. त्यामुळे त्याच्या या खेळीच्या जोरावर ब्रॅडमन संघाने केमप्लास्टने दिलेले १३३ धावांचे आव्हान १८ व्या षटकातच पार केले आणि सामन्यात विजय मिळवला.
विशेष म्हणजे या सामन्यात धोनीने कमरान, मलिक आणि सलमान बट या तीन पाकिस्तानी खेळाडूंसह फलंदाजी केली होती.
हा सामना ब्रॅडमन संघाने जिंकला असला तरी त्यांना अंतिम सामन्यात प्रवेश मिळवता आला नव्हता. अंतिम सामना कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि एअर इंडिया यांच्यात झाला. एअर इंडियाने कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचा पराभव करत विजेतेपद मिळवले होते. त्या स्पर्धेत धोनी सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होता.
पुढे जाऊन धोनी भारताने २००६ मध्ये खेळलेला पहिला वहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामनाही खेळला. तसेच २००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी२० विश्वचषकात भारताचे नेतृत्व तर केलेच पण त्याच्या नेतृत्वाखाली भारताला विजेतेपदही मिळवून दिले.
ट्रेंडिंग घडामोडी –
रोहित म्हणतो, मी नसतो तर विराटने एवढ्या धावाच केल्या नसत्या
टेलरच्या दुकानात कामाला, पुढे रिक्षाचालक ते जगातील स्टार फलंदाज असा प्रवास करणारा तो
कोहलीला ट्रोल करणे या देशाला पडले भलतेच महागात, चाहत्यांनी…