---Advertisement---

सर्जरीनंतर धोनीचा पहिला व्हिडिओ आला समोर, लेक झिवासोबत कुत्र्यांना खेळवताना दिसला ‘माही’

On: शनिवार, जून 24, 2023 11:11 PM
MS-Dhoni
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 हंगामात स्पर्धेचा किताब चेन्नई सुपर किंग्स संघाने आपल्या नावावर केला. यासह महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई संघ 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनला. सीएसकेला पाचव्यांदा चॅम्पियन बनवल्यानंतर धोनी सध्या यावेळी ब्रेकवर आहे. धोनी रांची येथे आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्या घालवत आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात धोनीच्या गुडघ्याची सर्जरी झाली होती. काही दिवसांपूर्वी धोनीचा भाऊ नरेंद्र सिंग धोनी याच्यासोबतचा फोटो समोर आला होता. यानंतर आता सोशल मीडियावर धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत धोनी मुलगी झिवासोबत कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे.

एमएस धोनी (MS Dhoni) याची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) हिने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये हार्ट आणि कुत्र्याच्या इमोजीचा समावेश केला आहे.

https://www.instagram.com/reel/Ct1rIEFgEoi/?utm_source=ig_embed&ig_rid=06eb0ed7-57c2-4715-9cf9-84c61b0e0616

खरं तर, धोनीचे रांची (Ranchi) येथे आलिशान फार्महाऊस आहे. या फार्महाऊसवर वेगवेगळ्या जातीचे 4-5 पाळीव कुत्रे आहेत. त्यांच्यासोबत धोनी अनेकदा खेळताना दिसतो. तसेच, त्यांना ट्रेनिंगही देताना दिसतो. कुत्र्यांव्यतिरिक्त धोनीच्या या फार्महाऊसवर घोडेही आहेत.

आयपीएल 2024मध्ये खेळताना दिसणार धोनी
महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आतापर्यंत आयपीएल 2024 (IPL 2024) हंगामात खेळताना दिसू शकतो. आयपीएल 2023 हंगामाचा किताब पटकावल्यानंतर धोनी म्हणाला होता की, जर त्याच्या शरीराने साथ दिली, तर तो पुढील हंगामात खेळताना दिसू शकतो. धोनीच्या गुडघ्यावर या महिन्याच्या सुरुवातीला सर्जरी झाली आहे. यानंतर तो रिहॅब करेल.

धोनीची आयपीएल कारकीर्द
एमएस धोनी याने आयपीएलमध्ये एकूण 250 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 218 डावात फलंदाजी करताना 38.79च्या सरासरीने आणि 135.92च्या सरासरीने 5082 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 24 अर्धशतकेही झळकावली आहेत. 84 ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. (MS Dhoni playing with their pets at home with daughter ziva)

महत्वाच्या बातम्या-
‘मी विराटशी फक्त 4…’, कोहलीसोबतच्या कथित रिलेशनशिपबद्दल अभिनेत्री तमन्ना भाटियाचा खुलासा
झिम्बाब्वेसाठी रझाच ‘सिकंदर’! वर्ल्डकप क्वालिफायर्समध्ये वेस्ट इंडिजवर मिळवला ऐतिहासिक विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---