आयपीएल 2024 चे वेध आता लागले आहेत. येत्या 22 मार्चपासून जगातील सर्वात मोठ्या टी 20 स्पर्धेला सुरुवात होईल. यासाठी सर्व फ्रँचायझींनी तयारी सुरू केली आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं शुक्रवारी संध्याकाळी चेपॉक येथील सराव शिबिरात भाग घेतला. यावेळी तो नेटमध्ये त्याच्या जुन्या लूकमध्ये दिसला. धोनीनं 2004 मध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्याचा लांब केसांचा लूक खूपच लोकप्रिय झाला होता. आगामी आयपीएलमध्ये धोनी पुन्हा एकदा त्याच लूकमध्ये दिसणार आहे. नेटमध्ये सराव करताना लांब केसांच्या धोनीनं खूप घाम गाळला. विशेष म्हणजे आयपीएल 2023 ची फायनल मॅच जिंकल्यानंतर तो प्रथमच क्रिकेट खेळताना दिसणार आहे.
शनिवारी चेन्नई सुपर किंग्सनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये एमएस धोनी नेटमध्ये सराव करताना दिसतोय. यावेळी धोनीचा चेहरा आत्मविश्वासानं भरलेला दिसत होता. सरावादरम्यान धोनीनं जास्त मोठे शॉट्स मारण्याचा प्रयत्न केला नाही, मात्र तो मोठ्या आत्मविश्वासानं ड्राइव्ह मारत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. धोनीनं यावेळी फिरकीपटूंचा सामना केला आणि चेपॉकमधील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. धोनीची ही एक झलक पाहायला मिळताच त्याचे चाहते उत्साहित झाले आहेत. आता त्यांना धोनी मैदानावर कधी परतेल, याची प्रतीक्षा आहे.
Stepping into Chepauk after a year, one could feel the excitement of Thala! #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/CczaDDktAK
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 9, 2024
चेन्नई सुपर किंग्ज 22 मार्च रोजी चेन्नईमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध त्यांच्या नवीन हंगामाची सुरुवात करेल. धोनीनं गेल्या वर्षी गुडघ्याच्या समस्येवर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया केली होती. आयपीएल 2024 ची तयारी सुरू करण्यासाठी तो या महिन्याच्या सुरुवातीला चेन्नईला पोहचला.
महेंद्रसिंह धोनी मार्चच्या सुरुवातीला जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या उत्सवात सहभागी झाल्यानंतर चेन्नईला पोहोचला आहे. आयपीएलच्या नव्या सिजनमध्ये धोनी जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्या मॅच फिटनेसवर असतील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध नाणेफेकीसाठी जेव्हा हा 5 वेळचा विजेता कर्णधार मैदानात उतरतो तेव्हा खचाखच भरलेलं स्टेडियम त्याचं स्वागत करेल यात शंका नाही!
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 साठी धोनीचा विंटेज लूक, लांब केसांसह फोटो सोशल मीडियावर व्हायरल
IPL 2024 : धोनीची वाढली डोकेदुखी! ‘बेबी मलिंगा’ला झाली दुखापती, हंगामातून जाणार बाहेर? वाचा सविस्तर