शनिवारी (१५ जानेवारी) विराट कोहली (virat kohli) याने भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. यापूर्वी त्याने टी-२० संघाचे कर्णधारपद स्वतःच्या इच्छेने सोडले होते. तर एकदिवसीय संघाचे कर्णधारपद त्याच्याकडून हिरवून घेतले गेले होते. विराटने आता कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर एमएस धोनीने काही वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. धोनीने यावेळी भारताच्या कसोटी आणि मर्यादित षटकांतील वेगवेगळ्या कर्णधारपदावर वक्तव्य केले होते.
धोनीने २०१७ मध्ये भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद सोडले होते आणि त्यापूर्वीच २०१४ मध्ये कसोटी संघाचे कर्णधारपद देखील सोडले होते. मर्यादित षटकांतील संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर पुण्यात त्याच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत भारतात विभाजित कर्णधारपद उपयोगी पडत नाही, असे धोनी म्हटला होता.
व्हिडिओ पाहा- कर्णधार पद, रोहित, बीसीसीआय अन् बरंच काही… बोलतोय ‘किंग कोहली’
यावेळी पत्रकार परिषदेत तो म्हणाला होता की, “विभाजित कर्णधारपद भारतात कामी येत नाही. माझ्यासाठी पुढे जाणाची हीच योग्य वेळ होती. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ असेल.”
“मी विभाजित कर्णधारपदावर विश्वास ठेवत नाही. संघात एक नेतृत्व पाहिजे. विभाजित कर्णधारपद भारतात काम करत नाही. मी योग्य वेळेची वाट पाहत होतो. विराटला कामात सहजपणा यावा, अशी माझी इच्छा होती. या संघात तिन्ही प्रकारांमध्ये चांगले प्रदर्शन करण्याची क्षमता आहे. मला वाटते की, ही पुढे जाण्याची योग्य वेळ आहे,” असे धोनी त्यावेळी म्हणाला होता.
२०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान धोनीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर विराट कोहली भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार बनला होता. त्यानंतर भारतीय संघाला कसोटी आणि मर्यादित षटकांमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार मिळाले होते. परंतु ही गोष्ट संघासाठी फायदेशीर ठरली नाही. यादरम्यान भारताने ऑस्ट्रेलियामध्ये २०१५ विश्वचषक आणि मायदेशातील टी-२० विश्वचषकात उपांत्य सामन्यापर्यंत मजल मारली, पण जेतेपद जिंकता आले नाही. परंतु कसोटी क्रिकेटमध्ये विराट चांगले प्रदर्शन करत होता.
महत्वाच्या बातम्या –
व्हिडिओ पाहा –






