व्हिसा प्रकरणातून अखेरीस नोवाक जोकोविचच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा 9वेळा जिंकणाऱ्या जोकोविचला फेडरल कोर्टने ऑस्ट्रेलियातून हद्दपार करण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे त्याला पुन्हा सर्बियाला परतावे लागणार आहे.
#Novak_Djokovic to be deported after he loses the case ! #AustralianOpen2022 #novaxdjokovic pic.twitter.com/8sMxOV8sSL
— ???????????????? ???????????????????????????????????? (வாழப்பாடி இராம சுகந்தன்) (@vazhapadi) January 16, 2022
BREAKING: Novak Djokovic will be deported from Australia, denying the tennis champion the opportunity to win a record 21st Grand Slam.#Djokovich
— Saffron Sach (@Saffron_Sach) January 16, 2022
इमिग्रेशन मंत्र्यांचा निर्णय कायम ठेवत, फेडरल कोर्टने हा ऐतहासिक निर्णय दिला. त्यानुसार नोव्हाक जोकोविचला ऑस्ट्रेलियातून बाहेर जावे लागेल, आणि त्याचे ऐतिहासिक विजयाचे स्वप्नही अपूरेच राहणार आहे.
नक्की काय आहे प्रकरण
ऑस्ट्रेलियामध्ये १७ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ ही ग्रँडस्लॅम स्पर्धा सुरू होणार आहे. त्यासाठी जोकोविच ६ जानेवारी रोजी ऑस्ट्रेलियाला पोहचला आहे. मात्र, त्याच्याकडे कोरोना लसीबाबत आवश्यक असणारी कागदपत्रे नव्हती. तसेच लसीकरणाच्या नियमातून सुट मिळाल्याचीही आवश्यक कागदपत्रे नसल्याने त्याचा व्हिसा पहिल्यांदा रद्द करण्यात आला होता. त्यामुळे त्याला विमानतळावरून पहिल्यांदा ताब्यात घेण्यात आले होते.
पण त्यानंतर त्याने न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी त्याला मेलबर्न न्यायालयाने ऑस्ट्रेलियन सरकारद्वारे जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हणत त्याला दिलासा दिला होता. त्यामुळे जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली होती.
व्हिडिओ पाहा- कर्णधार पद, रोहित, बीसीसीआय अन् बरंच काही… बोलतोय ‘किंग कोहली’ ।
मात्र, शुक्रवारी (१४ जानेवारी) ऑस्ट्रेलियाचे इमिग्रेशन मंत्री ऍलेक्स हॉक यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत जोकोविचचा व्हिसा पुन्हा एकदा रद्द केला आहे. आरोग्य आणि सुव्यवस्था ही कारणे देत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यानंतर त्याच्या व्हिसावर सुनावणी सुरू असल्याने पुन्हा एकदा जोकोविचला ऑस्ट्रेलियन सरकारने ताब्यात घेतले आहे. यामुळे जोकोविचच्या ऑस्ट्रेलियन ओपनमधील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
जोकोविचची कामगिरी
जोकोविचने आत्तापर्यंत २० ग्रँडस्लॅम विजेतीपदं मिळवली आहेत. सध्या पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या टेनिसपटूंच्या यादीत जोकोविच राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्यासह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे. जोकोविचने जिंकलेल्या २० ग्रँडस्लॅम विजेतेपदांमध्ये ९ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या विजेतेपदांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जोकोविचमागची साडेसाती संपेना! ऑस्ट्रेलियन सरकारने मेलबर्नमधून घेतलं ताब्यात
हेही पाहा-