जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम २६ मार्चपासून मुंबई येथे सुरू होणार आहे. आयपीएल २०२२ साठी सर्व संघांनी कंबर कसली असून, काही संघांनी आपली सराव शिबिरे सुरू केली आहेत. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने सुरत येथे आपले सराव शिबिर आयोजित केले आहे. संघाचा कर्णधार एमएस धोनी नुकताच सुरत येथे पोहोचला. चेन्नईने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
सुरत येथे होणार पहिले सराव शिबिर
चार वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावलेल्या चेन्नईने आगामी हंगामासाठी आपले सराव शिबिर सुरत येथील लाल बाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर घेण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल वीस दिवस हे सराव शिबिर चालेल. सुरत येथील खेळपट्ट्या मुंबईच्या खेळपट्ट्या ज्या मातीच्या बनवल्या जातात त्या मातीच्या आहेत. आयपीएलचा आगामी हंगाम २६ मार्चपासून मुंबई येथील तीन व पुणे येथील एका स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
Surat-thenga adra adra! 🥳😍
Whistles parakkatum for our #SingamsInSurat! 🦁#WhistlePodu #Yellove 💛 pic.twitter.com/ZTzRy8xTGx— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 3, 2022
चेन्नई सुपर किंग्सने या शिबिरासाठी संघाचा कर्णधार एमएस धोनी पोहोचल्याची माहिती दिली. धोनी गाडीतून उतरत असतानाचे छायाचित्र त्यांनी पोस्ट केले आहे. संघाच्या सराव शिबिरात धोनीसह ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा अंबाती रायडू व अन्य क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत.
मुंबई व पुणे येथे खेळली जाणार आयपीएल
कोरोनामूळे यावर्षी स्पर्धा मुंबई येथील वानखेडे स्टेडियम, डी वाय पाटील स्टेडियम व ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळली जाईल. तसेच, पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमच्या स्टेडियमवर देखील सामने खेळवले जाणार आहेत. २६ मार्चपासून चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये पहिला सामना होऊ शकतो. यावर्षी गुजरात टायटन्स व लखनऊ सुपरजायंट्स हे दोन नवे संघ स्पर्धेत सहभागी झाल्याने स्पर्धा दोन गटात खेळली जाईल.
महत्वाच्या बातम्या-