---Advertisement---

पहिल्या टी20 मधील विजयानंतर कर्णधार सूर्याचा आनंद गगनात मावेना; चक्क! असं काही बोलला…

On: रविवार, जुलै 28, 2024 8:46 AM
Suryakumar-Yadav
---Advertisement---

भारताचा नवा पूर्णवेळ टी20 कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवने शनिवारी (27 जुलै) श्रीलंकेविरुद्ध पहिला टी20 सामना जिंकून विजयी वाटचाल सुरु केला. सामन्यानंतर बोलताना त्याने सांगितले की, श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली असली तरी यजमानांविरुद्धच्या सामन्यात त्यांनी वर्चस्व गाजवले आहे. कारण तेथे दव नव्हते. ज्यामळे त्यांच्या गोलंदाजांसाठी अडचणी निर्माण केल्या.

भारताने दिलेल्या 214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने 2 बाद 149 धावा केल्या होत्या, मात्र त्यानंतर 21 धावांत आठ गडी गमावून यजमानांनी 43 धावांनी सामना गमावला. सूर्यकुमार यादव 26 चेंडूत 58 धावा करत ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला. यानंतर बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, ‘आम्ही भाग्यवान होतो की मैदानावर दव नव्हते.’

सूर्यकुमार यादवने चांगली फलंदाजी केल्याबद्दल श्रीलंकेच्या संघाचे कौतुक केले, तो पुढे बोलताना म्हणाला, परंतु सामना पुढे जाईल तसतशी खेळपट्टीही संथ होत जाईल हे मला माहीत होते. ते (श्रीलंका संघ) पहिल्याच चेंडूपासून उत्कृष्ट क्रिकेट खेळत होते. याचे श्रेय त्यानांच जाते. पण रात्री विकेट कशी असते हे आम्हाला माहीत आहे. आम्ही भाग्यवान होतो की दव नव्हते.

श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंका म्हणाला, ‘पॉवरप्लेमध्ये आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही, पण शेवटच्या भागात आम्ही जोरदार पुनरागमन केले. आम्हाला वाटत होते की ते 240 धावांपर्यंत पोहोचतील, पण आम्ही चांगली कामगिरी केली.’ संपूर्ण संघ 170 धावांवर बाद झाल्यानंतर श्रीलंकेच्या कर्णधाराने निराशा व्यक्त केली. तो म्हणाला, ‘मी मधल्या फळीतील फलंदाजीबद्दल थोडा निराश आहे, आम्ही आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो.’

हेही वाचा-

भल्या भल्यानां नाही जमलं, ते हार्दिकनं करुन दाखवलं; ठरला पहिलाच भारतीय खेळाडू
पॅरिस ऑलिम्पिक : हाॅकीमध्येही भारताची शानदार कामगिरी, न्यूझीलंडचा 3-2 ने पराभव
IND vs SL पहिला सामना जिंकून भारताची विजयी सलामी, सूर्यकुमारचं झंझावाती अर्धशतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---