आयपीएल 2023 मध्ये बुधवारी (12 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना खेळला जाणार आहे. विजयरथावर आरुढ असलेल्या या दोन्ही संघातील सामना अटीतटीचा होऊ शकतो. या सामन्यातील विजेत्या संघाला गुणतालिकेत पहिला स्थानी जाण्याची संधी असेल. त्याचवेळी या सामन्यात कर्णधार म्हणून उतरताना चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याच्याकडे एक मोठा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे.
चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर हा सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. यापूर्वी दोन विजय संपादन केलेल्या या दोन्ही संघातील ही लढत उत्कंठावर्धक होऊ शकते. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी नाणेफेकीसाठी मैदानात आल्यानंतर त्याच्यासाठी हा चेन्नईचा कर्णधार म्हणून आयपीएलमधील 200 वा सामना असेल. यापूर्वी आयपीएलमध्ये अशी कामगिरी कोणत्याही कर्णधाराने केली नाही.
धोनीने चेन्नईचे कर्णधार म्हणून 199 सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. यामध्ये संघाने 120 विजय मिळवले असून, 78 पराभव पाहिले आहेत. तर, एक सामना अनिर्णीत राहिला आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईच्या विजयाची सरासरी 60.60 अशी दिसून येते. धोनीने 2008 ते 2015 असे सलग आठ वर्ष चेन्नईचे नेतृत्व केलेले. त्यानंतर तो दोन वर्ष पुणे संघाचा भाग राहिला. 2018 मध्ये चेन्नईने पुनरागमन केल्यानंतर पुन्हा त्याच्याकडे संघाचे नेतृत्व दिले गेले. 2021 पर्यंत तो चेन्नईचा कर्णधार राहिला. मागील हंगामात सुरुवातीला रवींद्र जडेजाला चेन्नईचा कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, त्याच्या नेतृत्वात संघ चांगली कामगिरी करू न शकल्याने, पुन्हा दोन्हीकडे ही जबाबदारी दिली गेली.
धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. तसेच 11 वेळा संघ प्ले ऑफ खेळण्यासाठी पात्र ठरला. धोनी कदाचित यावेळी आपला अखेरचा हंगाम खेळत आहे असे जाणकारांनी म्हटले आहे.
(MS Dhoni Ready 200 th Time Lead CSK In IPL As Captain Against Rajasthan Royals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खराब फॉर्मातील सूर्यकुमारला गुरू रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, फलंदाज पुन्हा पाडणार धावांचा पाऊस?
पियुष चावला ईज बॅक! ललित यादवचा त्रिफळा उडवत नावावर केला आयपीएलमधील मोठा विक्रम